Making It In Theater Dainik GOmantak
ब्लॉग

Making It In Theater: नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीतील यशस्वी चेहरे

नाटकांमधल्या पात्रांची भाषा एरवीपेक्षा वेगळी होती.

गोमन्तक डिजिटल टीम

डॉ. वेदिका वाळके

या नाटकांमधल्या पात्रांची भाषा एरवीपेक्षा वेगळी होती. ती माझ्या परिचयाची नसल्यामुळे, ती भाषा बोलण्याचा सराव करण्यासाठी थोडी अधिक मेहनत घ्यावी लागली.

हे नाटक लोककलेच्या अंगाने जाते त्यामुळे त्यात थोडा ‘लाऊडनेस’ होता. आतापर्यंत मी केलेल्या भूमिका ‘नॅचरलिस्टिक’ शैलीच्या होत्या त्यामुळे या नाटकासाठी आवश्यक असलेल्या ‘अती’ अभिनयाकडे मला जुळवून घ्यावे लागले.

अर्थात, दिग्दर्शक निलेश महाले यांची त्यासाठी खूप मदत झाली. तालमी दरम्यान आमच्या खूप चर्चा होत असत व त्यातून दिग्दर्शकाला काय हवे याची जाणिव व्हायची. एकंदर या नाटकाची सबंध प्रक्रिया मी खूप एन्जॉय केली.

नीलेश महाले

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत मी दिग्दर्शित केलेले नाटक सादर करण्याची ही 5 वी वेळ. यावेळी मी सादर करत असलेल्या ‘एन्फिल्ट्रेशन’ या नाटकात असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांमुळे (लोककला, संगीत, कथा इ.) हे नाटक स्पर्धेत क्लिक होणार अशी माझी खात्री होती.

गोव्यात झालेल्या प्रथम फेरीतून हे नाटक अंतिम स्पर्धेत निवडले गेल्यानंतर या नाटकावर मी वेगवेगळ्या पातळीवर अधिक काम केले. गोव्यातील प्रयोगानंतर प्रत्येकाकडून आलेल्या सूचना मी गंभीरपणे घेतल्या होत्या व त्यादृष्टीने प्रयोगात फेरफारही केला.

आमच्या नाटकाचा अंतिम फेरीतील प्रयोग नाशिकमधील परशुराम नाट्यगृहात होता. हे नाट्यगृह जुनाट पद्धतीचे व आटोपशीर असे आहे. पण त्या नाट्यगृहाचे स्वरूप व आमचे लोककलेच्या अंगाने जाणारे नाटक यात एकप्रकारची सुसंगती होती.

ह्या बाबीचा व रंगमंचाच्या आटोपशीरपणाचा फायदा आमच्या नाटकाला नक्कीच झाला असे मला वाटते. नाटकाच्या प्रयोगात साऱ्यांचाच छान सूर लागला आहे असे जाणवत होते. कलाकारांची आणि तंत्रज्ञानाची ऊर्जा निश्चितच वरच्या पातळीवरची होती.

या साऱ्या गोष्टीमुळे हा प्रयोग सुरेख होत गेला. नाटक सादर झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचा प्रतिसाद तर विस्मयकारक होता. नाटक संपल्यानंतरही सुमारे एक तास आम्ही त्या प्रेक्षकांच्या आणि त्यांच्या कौतुकाच्या गराड्यात होतो.

संस्कृती रायकर

मेडिकल कॉलेजमध्ये 'पेडियाट्रिक ऑक्युपेशन थिअरी' या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन करणारी संस्कृती सांगते- ‘नाटकात अभिनय करण्याची मला उत्कट आवड असल्यामुळे माझ्या अभ्यासातून वेळ काढून मी स्वतःला अँडजस्ट करते.

त्याला दुसरा पर्याय नाही. ‘एक रिकामी बाजू’ हे नाटक अतिशय बोल्ड आहे. ‘ब्रेस्ट कॅन्सर’ या विषयावर हे नाटक आहे आणि त्यात मी सादर करत असलेली व्यक्तीरेखा एक प्रकारच्या मानसिक, शारीरिक धक्यातून जात असते.

माझे सहकारी कलाकार मँच्युअर असल्यामुळे आणि दिग्दर्शक सुशांत नायक यांच्या संयत ट्रिटमेंटमुळे ही भूमिका मी मोकळेपणी करू शकले. माझ्या मेडिकल पार्श्वभूमीचा फायदा ही भूमिका निभावत असताना मला अर्थातच झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

SCROLL FOR NEXT