World Nature Conservation Dainik Gomantak
ब्लॉग

World Nature Conservation Day: जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त...

निसर्गात अवास्तव ढवळाढवळ न करणे इतके लहानसे जरी योगदान मानवाने दिल्यास निसर्ग आणि निसर्गाची अपत्ये असलेले जीव भयमुक्तपणे बहरू-बागडू शकतात.

गोमन्तक डिजिटल टीम

डॉ. एम. आर. रमेशकुमार

World Nature Conservation Day: गोव्याचे जंगल क्षेत्र सुमारे 1424 चौरस किलोमीटर आहे. जैवविविधतेसाठी जगात महत्त्वाचे गणले गेलेल्या क्षेत्राचा- पश्चिम घाटाचा एक भाग गोव्यात आहे.

राष्ट्रीय उद्यान (भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान) आणि सहा वन्यजीव अभयारण्ये (बोंडला, भगवान महावीर, खोतीगाव, म्हादई नेत्रावती व चोडण येथील सलीम अली पक्षी अभयारण्य) आहेत.

दरवर्षी 28 जुलै या दिवशी जागतिक निसर्ग संवर्धन दिवस साजरा केला जातो. खरे तर निसर्गात माणसाने हस्तक्षेप केला नाही तर निसर्ग स्वतःचे संरक्षण व संवर्धन करण्यास समर्थ आहे.

निसर्गात अवास्तव ढवळाढवळ न करणे इतके लहानसे जरी योगदान मानवाने दिल्यास निसर्ग आणि निसर्गाची अपत्ये असलेले जीव भयमुक्तपणे बहरू-बागडू शकतात.

गोव्यातील एखाद्या अभयारण्याला भेट द्यायचा प्रसंग आल्यास आणि तिथले बारकाईने निरीक्षण केल्यास अनेक वन्यजीव आपल्या नजरेस येऊ शकतात. फुलपाखरे, सर्प, चतुष्पाद, कीटक, पक्षी यांनी समृद्ध असलेले तिथले रान विस्मयकारक असते.

बोंडला अभयारण्य तर लोकप्रिय स्थळ आहे जिथे पर्यटक आणि विद्यार्थी उत्साहाने भेट देत असतात. पश्चिम घाटात आढळणारे सांबर हरीण, गवा, मलबार खार, मोर, तऱ्हेतरेचे साप, बिबटे, नाचणारे अस्वल हे बोंडला अभयारण्याचे निवासी आहेत.

गोव्यातील या सुंदर वन्य जीवांची कीर्ती भारतीय टपाल खात्याने त्यांच्या टपाल साहित्यात- लिफाफा, तिकीट, रद्दीकरण इत्यादीमध्ये स्थान घेऊन जगभर पोहोचवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT