Blog : माध्यमे, अभिव्यक्ती आणि विचार

मला जे जाणवते त्याबद्दल लेखन अथवा भाषण करणे ही माझी वैयक्तिक अभिव्यक्तीची माध्यमे नाहीत.
Praveen Naik, Painter
Praveen Naik, PainterDainik Gomantak
Published on
Updated on

काही वर्षांपूर्वी अपूर्व कुलकर्णी (गोव्याचे नामवंत कला-इतिहास अभ्यासक) यांच्याबरोबर काम करत असताना माझ्या चित्रांमध्ये सामाजिक आणि राजकीय भान यायला सुरुवात झाली. त्या काळात बातम्या, नाटके वगैरेकडे अधिक समंजसपणे लक्ष देण्यास माझी सुरुवात झाली. आपण जे अनुभवतो, पाहतो त्या संबंधाने आपल्या कलाकृतीत एक विधान मांडले गेले पाहिजे याची जाणीव प्रखरपणे झाली.

मी स्वतः अनेक सामाजिक कार्याकडे जुळला गेलेलो आहे. वर्तमान काळात आजूबाजूला जे विदारक चित्र दिसते आहे ते प्रसार माध्यमातून प्रसिद्ध होऊनदेखील लोक त्या विरोधात गप्प राहिलेले दिसतात. 'मला काय त्याचे', अशी एकंदरीत अनेकांची मानसिकता बनली आहे. या अशा वातावरणाबद्दल मला चीड उत्पन्न होते. मला जे जाणवते त्याबद्दल लेखन अथवा भाषण करणे ही माझी वैयक्तिक अभिव्यक्तीची माध्यमे नाहीत. मग चित्रकार म्हणून मी काय करावे?

Praveen Naik, Painter
Blog : मिश्‍कील नजरेतून गोवा

खरंतर मी वेगळ्या जातकुळीचा चित्रकार आहे. कार्टून मी कधी फारशी रेखाटलेली नाहीत. पण मग मी विचार केला की का आपण कार्टूनमधून अभिव्यक्त होऊ नये? याची दोन कारणे होती- ज्या बेचैन वातावरणात मी सध्या आहे त्याचा धांडोळा मला घ्यायचा होता आणि दुसरे म्हणजे ज्या असहनीय गोष्टी माझ्या आजूबाजूला घडत आहेत त्या विरोधात चिमटाही काढायचा होता.

माझ्या मनात जे काय खदखदते आहे ते चार लोकांना मी माझ्या माध्यमातून सांगू शकलो तर मला समाधान तरी मिळाले असते. या हेतूने वर्तमान स्थितीवर भाष्य करणारी कार्टून चित्रे रेखाटून मी ती समाज माध्यमांवर टाकण्यास सुरुवात केली.

Praveen Naik, Painter
Blog : डॉ. स्वप्निल याने लिहिलेला चित्रपट व्हेनिस महोस्तव

मला ठामपणे वाटते की आपल्याला शक्य असेल त्या माध्यमाद्वारे प्रत्येकाने आज व्यक्त होणे गरजेचे आहे. मी एके ठिकाणी वाचले होते की हिटलरला चित्रकार बनायचे होते पण त्याची ती उर्मी दबून राहिली गेली आणि मग ती एका वेगळ्या विकृत वळणाने व्यक्त झाली. असे आपले होऊ नये म्हणून तरी आपण प्रामाणिकपणे व्यक्त व्हायलाच हवे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com