Fest, One Gets A Glimpse Of The Life Of People Of Goa. Gomantak Digital Team
ब्लॉग

Purument Fest : पुरूमेंत म्हणजे काय?

पुरूमेंत फेस्तचे पणजीत आयोजन केले होते. या फेस्तला फारच चांगला प्रतिसाद मिळाला.

गोमन्तक डिजिटल टीम

पुरूमेंत फेस्तला गोमंतकीय लोकजीवनात अनन्यसाधारण असे महत्त्‍व आहे. संपूर्ण जगभरात शेती आणि शेतकरी यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या जत्रा होत असतात जिथे स्थानिक शेतमालाला, वेगवेगळ्या पदार्थांना बाजारपेठ मिळवून दिली जाते. पुरूमेंत फेस्त हा देखील त्यातलाच एक प्रकार आहे. गोव्यात जूनपासून पुढचे तीन महिने जोरदार पाऊस पडतो.

पूर्वी दळणळणाची साधने कमी होती, त्यामुळे इतर गावांशी, बाजारपेठेशी संपर्क तुटायचा. घरातून बाहेर पडणे मुश्कील होऊन जायचे. मग या दिवसात लागणाऱ्या विविध गोष्टी, वस्तू, पदार्थ, शेतीमाल याची साठवणूक करण्यासाठी ''पुरूमेंत फेस्त'' भरू लागले. पुरूमेंत म्हणजे प्रोव्हिजन - म्हणजेच साठवणूक. या फेस्तच्या माध्यमातून गोव्याच्या लोकजीवनाची झलक बघायला मिळते.

पुरूमेंत हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. जत्रा जरी मे महिन्यात सुरू होत असली तरी घरगुती पातळीवर याची तयारी एप्रिलमध्येच सुरू होते. गोमंतकीय लोकजीवनातील पुरूमेंत फेस्तचे महत्त्‍व बघून ‘तनिष्का’ व्यासपीठच्या माध्यमातून आपण दोन दिवसांच्या पुरूमेंत फेस्तचे पणजीत आयोजन केले होते. या फेस्तला फारच चांगला प्रतिसाद मिळाला.

Participation of senior women

ज्येष्ठ महिलांचा सहभाग

केरी -पालीये आणि मुळगावमधील तनिष्का गटातील दोन ज्येष्ठ सदस्यांनी पुरूमेंत फेस्तमध्ये स्टॉल घेतला होता. दोघीही सत्तर वर्षांच्‍या वरच्या; पण उत्साह तरुणींना लाजवेल असा! येणाऱ्या ग्राहकांना पुरूमेंतबद्दल त्या इतकी छान माहिती द्यायच्या की त्यांच्याकडे बघूनच अनेकांनी खरेदी केली.

या ज्येष्ठ अनुभवी आज्जी आपल्या सांगतात म्हणजे ही वस्तू नक्कीच चांगली असणार याची त्यांना खात्री वाटली असावी. दोघीनीं बाळ कैरीचं लोणचं, खळातली तोरं (मिठाच्या पाण्यात खारवलेल्या कैऱ्या), तऱ्हेतऱ्हेचे कंद, सोलं (आमसुलं), मिरी, खोबऱ्याच्या वड्या, सांडगे, पापड अशा असंख्य गोष्टी घेऊनआल्या होत्या. घरी जाताना त्या रिकाम्या हाताने गेल्या यातच सगळं आलं. त्यांचा सगळं माल विकला गेला.

Participation of senior women

दोघींच्या चेहऱ्यावर छान समाधान दिसत होतं. यात सहभागी झालेल्या प्रत्येकीचा अनुभव फारच बोलका आहे. तनिष्का व्यासपीठाने पहिल्यांदाच पुरूमेंत फेस्तचे आयोजन केले. मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे पुढच्या वर्षी तनिष्का व्यासपीठ अधिक जोमाने आणि अधिक ऊर्जेने वेगवेगळ्या शहरांत पुरूमेंत फेस्त आयोजित करणार आहे

Cashew

काजू बिया हातोहात संपल्या

मुरगावमधून तनिष्का गटातील सुषमा कुमठेकर या महिलेने आपल्या स्टॉलवर फक्त काजू बिया (ओले काजू) ठेवल्या होत्या. फक्त ओले काजू ठेवलेत हे बघून मलाच ते विकले जातील ना याची काळजी वाटत होती. बाकीच्या स्टॉलवर असंख्य प्रकारच्या गोष्टी होत्या आणि हिच्या स्टॉलवर फक्त ओले काजू. पहिल्या दिवशी ती 5000 काजू बिया घेऊन आली. संध्याकाळ पर्यंत सगळ्या संपल्या. दुसऱ्या दिवशी तिने दुप्पट बिया आणल्या तर दुसऱ्या दिवशी देखील सगळ्या संपल्या. काजू बियांवर तिने नेट नफा कमावला. हे सगळं अनुभवताना एक वेगळी मजा येत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT