Drama Dainik Gomantak
ब्लॉग

आपली नाटकं आणि आपलेच प्रश्न...

गोव्यात आपल्याकडे नाटक खरे तर आदिम काळापासून प्रचलित आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: गोव्यात आपल्याकडे नाटक खरे तर आदिम काळापासून प्रचलित आहे. आपल्याकडे ‘धालो’सारखा लोक नृत्य प्रकार आहे. बाहेरच्या देशात ज्याला नृत्यनाट्य किंवा संगीतनाट्य म्हटले जाते ते आपल्याला ‘धालो’ ह्या गोव्यातील अस्सल लोकनृत्यात, त्यातील नाट्यात आणि गाण्यांमध्ये दिसून येतं. पीटर ब्रुख जेव्हा ‘एम्टी स्पेस’ बद्दल बोलतो, तेव्हा त्याचं ते आपल्याला खूपच अनोळखी वाटतं पण ‘कालो’ ह्या लोककलेत जेव्हा गणपती प्रवेश करतो किंवा शंकासुर येतो तेव्हा तिथंसुद्धा ‘एम्टी स्पेस’च (रिकामा अवकाश) असतो आणि तो एका गावातील नटाने आपल्या बोलण्यातून आणि असण्यातून एकंदरीत भरून काढलेला असतो. काणकोण मधला ‘गाऊन काणी’ ह्या प्रकाराबद्दल तर बऱ्याच लोकांना माहीत नाही. तो एक प्रगल्भ नाट्यात्मक आणि कहाणी सांगण्याचा घाट (स्टोरी टेलींग फॉर्म) आहे, ज्यात गोव्यातील रंगभूमीची किंवा गोवा ह्या प्रांतातील नाटकाची आदिम बीजं लपलेली आपल्याला दिसून येतात.

ह्या सगळ्यांत पाहिलं नाटक सांगलीमध्ये लिहिलं गेलं काय किंवा ते गोव्याच्या भूमीत लिहिलं गेलं काय ह्याला माझ्या लेखी तसे काहीच महत्त्व नाही, मुळात मी ह्या भूमीत जन्माला आलो तेच माझं भाग्य. एवढा मोठा ‘मांडाचा’ किंबहुना रंगभूमीचा इतिहास असूनसुद्धा आज आपल्याला ज्या पद्धतीने रंगभूमी घडताना दिसत आहे, ती मोठी प्रश्नार्थक बाब आहे. सध्याच्या ‘विकसीत कलाकाराची’ प्रोसेनियम ही एक गरज बनलेली आहे. प्रोसेनियमच्या बाहेर तो नाटक करूच शकत नाही. कमानी रंगमंचाच्या (प्रोसेनियम) बाहेर होणाऱ्या नाटकाला नाटक म्हणतील का असेही प्रश्न आजच्या तरुण कलाकाराला पडत असावेत. किंवा त्याला बिचाऱ्याला आज कमानीबाहेर पडायला तसं काही कारणच उरलेलं नसावं. जेव्हा आज मांडावरचे खेळ, नृत्य, नाटकुलीदेखील कमानी रंगमंचावर खेळवले जाताना दिसतात तेव्हा दुर्दैवाने कुठे राहिलाय मांड आणि कुठे राहिलंय अंगण?

‘स्पर्धात्मक’ वातावरणात आपण काहीतरी भलत्याच पाऊलखुणांच्या मागे चालत आहोत असे मला बऱ्याचदा वाटते. म्हणजे लोककलेच्या स्पर्धा आपण बघतो. त्यात एखादा ग्रुप ‘धालो’, दुसरा ‘समईनृत्य’, तर तिसरा ‘मांडो’ खेळतो. ह्यात मला प्रश्न पडतो की परीक्षक कशा पद्धतीने ह्याचं मूल्यमापन करत असावे?, म्हणजे जर एकाच प्रकारच्या लोकनृत्याची स्पर्धा असेल तर ठीक. पण वेगवेगळ्या लोककलांमध्ये स्पर्धा घडूच कशी शकते?

आज मोठाले रंगमंच आपल्याकडे आहेत, पण तालीम करण्यासाठी कलाकारांना तशा जागा उपलब्ध आहेत का हा देखील प्रश्न आहे. उपलब्ध असला तरी त्यासाठी कितीतरी पैसे मोजावे लागतात. एवढ्या मोठ्या वास्तू बांधण्यासाठी व त्याच्या देखभालीसाठी जो खर्च येतो तो खर्च जनतेच्याच पैशांनी केला जातो. पण त्याऐवजी जर आपण ‘मांड’ ही संकल्पना सरकारी पातळीवर राबवली, गावातले ‘मांड’, जे नष्ट होत आहेत, तेच टिकवण्यासाठी जर प्रयत्न केले तर नाट्यकलाकारांना तालमीसाठी जागाही मिळू शकते आणि नव्या पिढीला ठशीव अश्या पाऊलखुणाही मिळतील.

- केतन जाधव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT