Dhargal Accident: बसचे चाक डोक्यावरुन गेले, धारगळ येथे बसखाली चिरडून एकाचा मृत्यू!

Dhargal: महाराष्ट्र एसटी बसची स्कूटरला धडक बसून झालेल्या अपघातात सुदीप रवी पाईकर (१८) हा भाटीवाडा-नेरुल येथील स्कूटरस्वार युवक जागीच ठार झाला.

पेडणे: धारगळ येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वर ट्रॅफिक सिग्नल व जुने आरटीओ कार्यालय यादरम्यानच्या रस्त्यावर बुधवार, ३० रोजी दुपारी २.१५ वा. महाराष्ट्र एसटी बसची स्कूटरला धडक बसून झालेल्या अपघातात सुदीप रवी पाईकर (१८) हा भाटीवाडा-नेरुल येथील स्कूटरस्वार युवक जागीच ठार झाला.

सविस्तर माहितीनुसार, एमएच १४-केक्यू-९७५३ या क्रमांकाची एसटी बस कोल्हापूरहून पणजीला जात होती तर स्कूटरस्वार त्याच दिशेने जात होता. पुढे असलेल्या स्कूटरला एसटीची धडक बसून स्कूटर बाजूला फेकली गेली तर सुदीपच्या डोक्यावरून बसचे चाक गेले. त्यात सुदीप जागीच गतप्राण झाला.

सुदीप रवी पाईकर हा युवक मोपा विमानतळ परिसरात फलकांच्या जाहिराती करण्याचे काम करत होता. हे काम आटोपून तो आपल्या जीए-०३-एजी-५६२८ या क्रमांकाच्या स्कूटरने घरी जात असताना हा अपघात घडला.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठवला आहे. पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, एसटी बसचालक उदयसिंग वसंतराव पोवार (करवीर-कोल्हापूर) याला पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उड्डाणपूल मार्गी लागणे आवश्यक धारगळ येथे या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाला आणखीन काही रस्ते जोडले गेल्याने येथे सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी सिग्नल लावण्यात आलेले आहेत; पण सिग्नल हिरवा झाल्यावर थांबलेली वाहने सुसाट वेगाने निघून जातात. तसेच अधूनमधून हा सिग्नलही योग्यरीत्या चालत नाही. म्हणून या ठिकाणी अशाप्रकारे होणारे अपघात टाळण्यासाठी सरकारने उड्डाणपूल बांधण्याच्या त्वरित हालचाली करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com