Shigmotsav
ShigmotsavDainik Gomantak

डिचोलीत उद्या शिगमोत्सवाची धूम

चंद्रकांत शेट्ये: चित्ररथ, रोमटामेळ, लोककलेसह वेशभूषा स्पर्धा
Published on

डिचोली: डिचोलीत येत्या मंगळवार दि. 29 मार्च रोजी शिगमोत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्त चित्ररथ, रोमटामेळ, लोककला स्पर्धेसह वेषभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती डिचोली शिगमोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे आणि लोकांच्या मागणीचा विचार करून शिगमोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. शेट्ये यांनी सांगून सर्वांच्या सहकार्यातून शिगमोत्सव यशस्वी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Shigmotsav
‘यंग इनस्पिरेटर्स’ तर्फे फर्मागुडीत करिअर मार्गदर्शन

येथील नगरपालिकेत घेतलेल्या या पत्रकार परिषदेवेळी आयोजन समितीचे सचिव दिलीप धारगळकर, राजन कडकडे, नगरसेवक नीलेश टोपले, नारायण बेतकीकर आदी समितीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

चित्ररथ, लोककला, रोमटामेळ आणि वेषभूषा स्पर्धेसाठी आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. सायंकाळी 6 वा. बोर्डे वडाकडून मिरवणुकीला प्रारंभ होणार असून, भायलीपेठमार्गे हिराबाई झांट्ये स्मृती सभागृहाजवळ मिरवणुकीची सांगता होणार आहे. खुल्या गटासह 5 ते 9 आणि 10 ते 15 वर्षे वयोगटातील स्थानिक मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. अशी माहिती दिलीप धारगळकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com