Goa Festivals: 'आनंदासाठी सण उत्सव हवे'

गोविंद गावडे: खांडोळ्यात ‘सम्राट होळी 2022’ उत्साहात
 Goa Festivals
Goa FestivalsDainik Gomantak
Published on
Updated on

खांडोळा: सण, उत्सवातून जीवन आनंदी बनते. शिमगोत्सवातील रंगोत्सवातून ताण, तणाव, दुख विसरले जाते आणि जीवनात आनंद निर्माण होतो. मानवीजीवनात संगीत, नृत्य आवश्‍यक आहे. ‘सम्राट’च्या होळी उत्सवातूनही संस्कृती, संस्कार, परंपराचे संवर्धन होते. त्याचा हा चांगला उपक्रम आहे, असे मत आमदार गोविंद गावडे यांनी खांडोळा सम्राट बच्या होळी उत्सवप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी सम्राटचे पदाधिकरी दीपक नार्वेकर, गुरूप्रसाद शिंक्रे, पांडुरंग गावकर, हनुमंत चोपडेकर, प्रवीण सबनीस, शाम नाईक, धर्मा चोडणकर व विविध सम्राट क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.गावडे पुढे म्हणाले, आपले जीवन निसर्गावर अवलंबून असून निसर्गचक्रानुसार जीवनाला गती मिळते. आपल्या परंपराचे पालन करीत मानवाची वाटचाल सुरू असले पाहिजे. आपल्या उत्सव, सणाद्वारे आपल्या कला सादर केल्या पाहिजे. त्यातून आनंद मिळतो. रंगोत्सवातून हास्य निर्माण होते, मन प्रसन्न होते, ताण दूर होतो.

 Goa Festivals
डिचोलीत विविध रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण

यावेळी विविध मान्यवरांनी सम्राट क्लबच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच रंगोत्सव, होळी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. होळीची परंपरा टिकवण्यासाठी, हे संस्कार दुसऱ्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्‍यकता असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. गुरूप्रसाद शिंक्रे, दीपक नार्वेकर, प्रवीण सबनीस, पांडुरंग गावकर यांनी रंगोत्सवाबाबत मत व्यक्त केले.यावेळी नैसर्गिक रंगाद्वारे रंगोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर रेन डान्स, गंमतीशीर खेळ, गीत गायन, स्पर्धा घेण्यात आल्या आणि पारितोषिकेही देण्यात आली.

सूत्रसंचालन रुपेश लिंगुडकर यांनी केले. हनुमंत चोपडेकर यांनी प्रास्ताविक केले तर शाम नाईक यांनी स्वागत केले. अनिकेत भगत यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Siolim Woman Investment Fraud
Goa Man ChatGPT Viral Video
Goa CM Pramod Sawant accident help
Bori culvert railing damage
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com