Octave Festival 2023 Gomantak Digital Team
ब्लॉग

Octave Festival 2023 : उत्तरपूर्वीय राज्यांच्या कला, परंपरा आणि संस्कृतीचा आविष्कार

चार दिवसीय महोत्सवात या 8 उत्तरपुर्वीय राज्यांचे कला, परंपरा, संस्कृति, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत आदि आविष्कार सादर होत आहेत.

मंगेश बोरकर

Octave Festival 2023 : गोवा राज्य कला व संस्कृती संचालनालयाचा "ऑक्टोव्ह 2023" महोत्सवाला शनिवारपासुन मडगावच्या रविन्द्र भवनात प्रारंभ झाला. ‘ऑक्टोव्ह’ म्हणजे भारताच्या उत्तर पूर्वेकडील आठ राज्यांचा समुह. या आठ राज्यांत त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, मणिपुर, मेघालय, मिझोराम, नागालॅंड, आसाम या राज्यांचा समावेश आहे.

या चार दिवसीय महोत्सवात या 8 उत्तरपुर्वीय राज्यांचे कला, परंपरा, संस्कृति, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत आदि आविष्कार सादर होत आहेत. आठही राज्यांची लोकनृत्ये, लोककलांचे सादरीकरण देखणे व कुशल असते. 

गोवा हे उदयपुर, राजस्थान येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे सदस्य आहे. या केंद्राचे गोव्यासह गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांसह दादरा नगर हवेली, दमण-दीव या केंद्रशासीत राज्यांचा समावेश आहे. या केंद्राद्वारे गोव्यात 8 वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.

त्यातील ‘ऑक्टोव्ह’ हा कार्यक्रम दर चार वर्षांनी एकदा गोव्यात आयोजित केला जातो. यापुर्वी 2017 या वर्षी हा कार्यक्रम आयोजित झाला होता. या कार्यक्रमाच्या आयोजनास केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सहकार्य लाभते.

यंदा या महोत्सवात बसंत रास नृत्य, लाय-हाराओबा, पुंग धोल धोलक चोलोम, थांग-ता, चेयरोल जागोय (मणिपूर), होजागिरी, ममिता (त्रिपुरा), चेराव, सरलामकाय (मिझोराम), माकु हे नगिची, लिथो शेले फेटा (नागालॅंड), करम, ना गुरनाय मवसानाय, बिहू नाच (आसाम), रिखांपदा, सर्जी कावा (अरुणाचल प्रदेश), का शाद मास्तेह, वांगला (मेघालय), चुटके, सिंघी चाम (सिक्कीम) ही लोकनृत्ये सादर केली जातील.

या  8 राज्यांच्या 19 पथकांमधून 300  कलाकार या महोत्सवात सहभागी झाले आहेत. या कलाकारांमध्ये लोककलाकार, गायक, वादक आणि हस्तकलाकारांचा समावेश आहे. या आठ राज्यांतील हस्तकलाकार आपापल्या प्रदेशातील पारंपारिक हस्तकलांचे प्रदर्शन व विक्री करीत आहेत.  

शनिवारी, महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी आठही राज्यांनी एकत्रीत सादर केलेली सिंफनी अप्रतिम होती. वेगवेगळ्या राज्यांतील लोककला, परंपरा व संस्कृती जाणुन घेण्याची ही गोमंतकीयांसाठी चांगली संधी आहे. हा महोत्सव 28 मार्च पर्यंत चालू असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT