Summers Dainik Gomantak
ब्लॉग

'चाफ्याहून ही तीव्र उन्हाचा वैशाखी घमघमाट'

'आभाळवाटा'या कवितासंग्रहातील शंकर रामाणी यांच्या 'उन्हाळा' या कवितेमध्ये उन्हांचे तरल चित्रण येते.

दैनिक गोमन्तक

अनुजा जोशी

रामाणींच्या समग्र कवितेत शब्दस्पर्शादि पंचसंवेदना तरलतेने व्यक्त झाल्या आहेत. कधी त्या सुट्या सुट्या येतात,तर कधी त्यांची विलोभनीय मिसळण येते. या कवितेतील हीच नजाकत आशयाला समृद्ध करते. 'चाफ्याहून तीव्र उन्हाचा वैशाखी घमघमाट' यामध्ये पु.शि.रेगेंच्या 'झाडावर जे गाणे पक्षी गातो' या मधील शब्दांच्या कलाकुसरीची नजाकत व अनेकार्थता आठवते.

यातील चाफा हा साधा पांढरा चाफा नसून मादक उग्रगंध असणारा केशरी-पिवळाधम्मक सोनचाफा आहे. या कवितेची ही पहिलीच ओळ एक तर 'चाफ्याहून तीव्र असणारा उन्हांचा वैशाखी घमघमाट'

अशी वाचता येते किंवा 'चाफ्याहून तीव्र असणाऱ्या उन्हांचा वैशाखी घमघमाट' अशीही वाचता येते. खरे बघू जाता उन्हाला गंधही नसतो नी म्हणण्यासारखा रंगही नसतो. पण इथे ते दोन्ही आहेत आणि अनुक्रमे दोन्हीही चाफ्याहून तीव्र झाले आहेत. उन्हांचा गंध चाफ्याहून तीव्र होणे हे वैशाखातले सुखावलेपण आहे, पण रंग चाफ्याहून प्रखर होणे हे वैशाखाने भाजून काढणे आहे. या दोन्ही विरोधी अर्थछटा 'वैशाखी घमघमाट' या एकाच मिश्र प्रतिमेतून नेमकेपणाने उमटल्या आहेत.

सुखसंवेदना व दाहकपणा दोन्ही एकाचवेळी अनुभवायला देणाऱ्या या उन्हाळ्यामध्ये सतारीवर खुडल्यासारखा, पक्ष्याचा पिळवटलेला सखोल सूर कानावर पडतो. कर्पूरशुभ्र उन्हांमध्ये एक रखरखती तंद्री लागते.

या अस्तित्वअबोल तंद्रीमध्ये, मलूल झालेल्या पापण्या जडावून रखरखत्या दिशा जवळ येत असल्याचा भास होतो व या ओसाडीतूनही सतेज वाटा फुटल्याचा साक्षात्कार होतो. नजरेसमोरचा अथांग माळ हा जणू 'अज्ञेयाचा प्रदेश'च असल्याचे भासते. आणि उन्हांच्या दाहकतेला पार करत, चाफ्याच्या सोनपिवळ्या गंधाने लपेटलेल्या, अनंताचा ध्यास घेतलेल्या असंख्य 'आभाळवाटा' उलगडलेल्या व उधळलेल्या दिसतात.

'आभाळवाटा' या 'मौज'प्रकाशित दुस-या संग्रहापासून खरोखरच रामाणींना कवितेचा स्वत: सूर सापडला. जुने सांकेतिकतेचे सर्व बंध झुगारून देऊन कविता वेगळ्या सतेज रुपांत अवतरु लागली व अज्ञाताच्या 'आभाळवाटां' वरून कवितेची वाटचाल सुरु झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT