पणजी बाजार: लिंबू , मिरचीचा भाव वाढला

कांदा, टोमॅटोचे दर समाधानकारक
panaji market
panaji marketDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेल्या काही आठवड्यांपासून भाज्यांचे दर समाधानकारक आहेत. कांदा, बटाटा, टॉमेटो यांचेही दर एक महिन्यापासून स्थिर आहेत. मात्र, उकाडा वाढू लागल्याने आता लिंबूचे दर वाढले असून पणजी मार्केटमध्ये पन्नास रुपयांना 8 ते 10 लिंबू विकले जात आहेत.

गेले काही आठवडे 10 रुपयांना तीन लिंबू मिळत होते, एक लिंबू पाच रुपयांना विकला जात आहे. मिरचीचा दर काही केल्या कमी होत नसून गेल्या महिनाभरापासून मिरचीचा दर 120 ते 160 रुपये प्रती किलो आहे. बहुतांशी जनतेने लस घेतल्याने आता बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढली आहे.

panaji market
पोलिसांनी सामान्य जनतेला संरक्षण द्यावे: अमरनाथ पणजीकर

पणजी बाजारात मानकुराद, तोतापुरी, हापूस आदी आंबे विक्रीसाठी उपलब्‍ध असून मानकुराद आंब्यांचे दर 1200 ते 3000 रुपये डझनपर्यंत उपलब्ध आहेत. मानकुराद आंब्याचे दर त्यांच्या आकारावर अवलंबून आहे. मेथी, कारली, बिनीस व भेंडीचे दर वाढलेले आहेत. तापमानात वाढ होत असल्याने संत्री, मोसंबी, कलिंगड, शहाळे, द्राक्षे आदी फळांना देखील बाजारात चांगली मागणी आहे.

हिरवी मिरची 120 ते 160 रुपये किलो

बाजारात नेहमीच हिरव्या मिरचीला मागणी असते. मात्र, सध्या मागणी इतका पुरवठा होत नसल्याने मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. देशात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस लागल्याने मिरचीचे उत्पादन घटले. त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांनी मिरचीला योग्य भाव मिळत नसल्याने मिरचीचे उत्पादन घेणे थांबविल्याने मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. बाजारात 40 ते 50 रुपये प्रती किलो दराने विकली जाणारी हिरवी मिरची सध्या 120 ते 160 रुपये प्रती किलो दराने विकली जात आहे. वाढलेल्या मिरचीचे दर सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारे नाहीत.

दर प्रती किलो (रुपयांत)

कांदा..................40

बटाटा.................30

टॉमेटो.................30

गवार..................50

कोबी.................40

फ्लावर...............30

गाजर.............60-80

बिनीस............65-70

भेंडी..............70-80

शिमला मिरची...............80

panaji market
युक्रेनमधील भारतीयांना ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ तर्फे मदत

पाले भाजी प्रती जुडी

मेथी...20 (50 ला तीन)

लालभाजी.............20

कांदापात..............20

मुळा..................20

पालक................20

शेपू...................10

लिंबू......50 रु. 8 ते 10

पुदिना.................10

कोथंबिर....20 (1 पेंडी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Temwada Beach Demolition
Sanjeel Kudchadkar Kidnapping Suspect
 Madhya Pradesh Tourism 2025
Girish Chodankar Anti Defection Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com