Goa Mango Festival Dainik Gomantak
ब्लॉग

8 मे रोजी सुरू होत आहे ‘आम्याचे फेस्त’

आंब्यापासून तयार केलेले पदार्थ आणि आंब्याची कलमे या महोत्सवात विक्रीला असतील.

दैनिक गोमन्तक

मारियस फर्नांडिस

8 मे रोजी सुरू होत असलेले ‘आम्याचे फेस्त’ हे ‘गोंयच्या फेस्ताकारा’ने आयोजित केलेले 50 वे फेस्त. ‘गोंयचो फेस्ताकार’ या नावाने परिचित असलेला मारियस फर्नांडिस यांची ही फेस्ते, धर्म-जाती पलीकडे जाऊन सर्वांना एकत्रित आणतात. गोव्याची वारसा चिन्हे असलेल्या बहुतेक गोष्टींचा महोत्सव त्याने आतापर्यंत आयोजित केला आहे. ‘पुस्तकांचे फेस्त’, ‘काजूचे फेस्त’ हे त्यांचे यंदाचे अगोदरचे महोत्सव होते. त्याच्या या महोत्सवांना कोणी प्रायोजक नसतो, कुणी प्रमुख पाहुणा नसतो, ना तिथे स्पर्धा असतात, ना मद्य असते. त्यांनी आयोजित केलेल्या प्रत्येक महोत्सवात ही विशेषता जपली गेली आहे.

तिसवाडीतील खोर्ली येथील ‘मोंतफोर्ट अकादमी’त हे वैशिष्ट्यपूर्ण ‘आम्याचे (आंब्याचे) फेस्त’ भरणार आहे. हा महोत्सव एका परीने स्थानिक जीवनाची, संस्कृतीची, स्थानिक ज्ञानाची आणि त्यांनी घडवलेल्या त्यांच्या सर्वांगीण विकासाची ओळख करून देतो, असे मारियस या महोत्सवाबद्दल बोलताना म्हणतात.

या महोत्सवाचा मुख्य उद्देश, स्थानिक आंब्यांच्या जातीबद्दल लोकांना जागरूक करणे हा असेल. या महोत्सवात निरनिराळ्या प्रकारचे स्थानिक आंबे आणि त्यांची झाडे याबद्दल आपल्याला जाणून घेता येईल. स्थानिक आंब्याच्या जाती गोव्यातून अलीकडच्या काळात कमी होत चाललेल्या आहेत. एकेकाळी गोव्यात 70 वेगवेगळ्या प्रकारचे आंबे उपलब्ध होते अशी नोंद आहे पण आता त्यापैकी केवळ 40 (किंवा त्यापेक्षा कमी) शिल्लक राहिले आहेत. मारियस यांचे म्हणणे आहे, गोव्यातल्या तरुणांनी आंब्यांच्या कलमांचे तंत्र शिकून घेऊन त्यातून आंब्यांचे नवीन प्रकार त्यानी विकसित करायला हवे.

महोत्सवात ‘बल्कावाच्यो गजाली’ अंतर्गत कृषितज्ज्ञ मिंगेल फर्नांडिस, आंब्याच्या झाडावरील वाढणारी बांडगुळे नियमित साफ कशी करावीत व झाडांची काळजी कशी घ्यावी याविषयी बोलतील. डॉक्टर मेरियन लोबो आमराईत सफर घडवून, आंब्याच्या झाडांच्या औषधी गुणधर्मांची माहिती देतील. विशेषतः आंब्याच्या पानात जंतुनाशक गुणधर्म असतात. जंगली जातीच्या आंब्यांचे (स्थानिक पातळीवर ‘घोटे’ म्हणून ओळखले जाणारे) महत्त्व त्या विशद करतील.

या महोत्सवात एला, ओल्ड गोवा येथील ‘सेंट्रल कोस्टल ॲग्रीकल्चरल इन्स्टिट्यूट’मार्फत विविध प्रकारच्या आंब्यांचे आणि त्यांच्या रोपट्यांचे प्रदर्शन होईल. शास्त्रज्ञ सुनेत्रा तळावलीकर या महोत्सवात आंब्यापासून बनवण्यात येणाऱ्या विविध मिठाई आणि पेयांचे प्रात्यक्षिक दाखवतील. ‘आंब्याची कलमे’ बनवण्यासंबंधी प्रियंका नाईक यांचे एक सत्र असेल.

विविध प्रकारचे आंबे, आंब्यापासून तयार केलेले पदार्थ आणि आंब्याची कलमे (रोपटी) या महोत्सवात विक्रीला असतील. गोमंतकीय खाद्यपदार्थांची रेलचेलही या महोत्सवात असणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने ‘गोवा गर्ल्स घुमट ग्रुप’ या महिला घुमटवादक पथकाची स्थापनाही या समारंभात होणार आहे.

फळांचा राजा असलेल्या आंब्याचे हे फेस्त, त्यातल्या भरगच्च कार्यक्रमामुळे आंब्याचे राजेपण निश्चितच मिरवणारे असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

History: कर्नाटक, महाराष्ट्र ते आंध्र: सहा शतके दख्खनवर अधिराज्य गाजवणाऱ्या 'चालुक्य' घराण्याची शौर्यगाथा

SCROLL FOR NEXT