knowledge and information Dainik Gomantak
ब्लॉग

अथातो धर्मजिज्ञासा: ज्ञान आणि माहिती

आज इतकी वाईट, अवनत स्थिती आहे की आपल्याजवळ काय ज्ञान होते, याची साधी माहितीही आपल्याला नाही.

दैनिक गोमन्तक

प्रसन्न शिवराम बर्वे

पली आध्यात्मिक उन्नती साध्य करण्यासाठी साधन चतुष्टय समजून घेणे आवश्यक आहे. यात ज्ञान, कर्म, भक्ती आणि वैराग्य ही साधने सांगितली आहेत. परमार्थ साध्य होण्यासाठी किंवा आत्मज्ञान होण्यासाठी विवेक, वैराग्य, शमादिषटक व मुमुक्षत्व हे साधन चतुष्टय सांगितले आहे.

ज्ञान म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण, आपण आजकाल माहितीलाच ज्ञान म्हणू लागलो आहोत. माहिती आणि ज्ञान यात फरक आहे. माहिती करून घ्यावी लागते, ज्ञान होते. माहिती असली म्हणजे ज्ञान होतेच असे नाही.

माहितीचे पृथक्करण करून, त्याचा अभ्यास करून, त्याचा अनुभव घेऊन आपल्याला यथार्थ स्वरूपाचे आकलन होते व अनुभूती होते त्याला ज्ञान असे म्हणतात.

एखाद्या गोष्टीचे ज्ञान होण्यासाठी आपल्याला त्यात गती, आवड व परिश्रम आवश्यक असतात. याच गोष्टी आपल्याला ज्ञान प्राप्त करण्यासाठी ‘अधिकारी’, पात्र बनवतात. प्रत्येक गोष्ट वर्गसंघर्षाशी जोडण्याची सवय जडल्यामुळे आपण ज्ञानालाही त्यात फरपटत आणले आहे.

‘ब्राह्मणांनी शूद्रांना ज्ञानापासून वंचित ठेवले’, हा सर्रास केला जाणारा आरोप आहे. हा आरोप करत असताना काळ आणि शिक्षण पद्धती यात असलेला फरक व झालेला बदल लक्षांतच घेतला जात नाही.

आज जसे ‘सर्वांना सर्व शिक्षण’ मिळते, तशी क्रमिक शिक्षण पद्धती पूर्वी नव्हती. व्यावसायिक शिक्षण व कौशल्यविकास घरीच होत असे. परंपरागत चालत आलेला व्यवसाय एका पिढीतून दुसऱ्या पिढीला शिकवला जायचा.

त्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण देणाऱ्या स्वतंत्र वेगळ्या शाळा नव्हत्या. इतकेच कशाला, व्यवसायाचे व निवासाचे स्थानही एकच होते. सगळ्यांचे व्यवहार घरातूनच चालायचे. परंपरागत व्यवसायाव्यतिरिक्त ज्याला भाषा, गणित, आयुर्विज्ञान, युद्धशास्त्र, वेदान्त, ज्योतिष शिकायचे असे तो गुरुकुलात जाऊन राहत असे.

गुरुकुलामध्ये दिले जाणारे शिक्षणही आजच्यासारखे सर्वांना समान नव्हते. कुठल्या शिष्यामध्ये काय जन्मजात गुण आहेत, त्याचा नैसर्गिक कल कुठल्या दिशेने आहे, त्याचे आकलन कसे आहे, याची परीक्षा घेऊन गुरू त्याप्रमाणे त्याला अनुकूल असे शिक्षण देत असत.

व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्य त्या व्यवसायात नसलेल्या इतरांना शिकवले जात नसे. त्यामुळे, व्यवसायावर आधारित असलेली एक जात आपल्या जातीचे शिक्षण जातीबाहेर जाऊ देत नसे.

कुंभाराला मेस्तकाम येत नसे, सुताराला लोहारकाम येत नसे, लोहाराला भिक्षुकी येत नसे, भिक्षुकी करणाऱ्याला नाभिकांचे ज्ञान व तंत्र माहीत नसे. ब्राह्मणांनाही त्यांच्या व्यवसायापुरते म्हणजे भिक्षुकीचे ज्ञान माहीत होते.

सगळ्या ब्राह्मणांना वेदान्त, दर्शने, उपनिषदे, ज्योतिष यांचे ज्ञान असत नव्हते व आजही नाही. आजही पौरोहित्य करणाऱ्या शेकडा ऐंशी ब्राह्मणांना ते काय म्हणत आहेत, याची माहिती नाही. त्या मंत्रांचा अर्थ माहीत नाही व तो जाणून घेण्याची इच्छाही नाही.

उलट, गुरुकुलात जाऊन शिक्षण घेतलेले अनेक पंडित, ज्यांनी सूक्ते रचली ते जातीने ब्राह्मण नाहीत. वेद काळात व नंतरच्या काळातही तीच स्थिती आहे. वेदांतील अनेक सूक्तांचे रचनाकार जातीने ब्राह्मण नसलेले व महिला विदुषी आहेत.

आद्य शंकराचार्य गावात येणार म्हणून त्यांच्या स्वागतार्थ मिश्र धातूचा एक खांब गावातील लोकांनी उभारला. त्याला आजही गंज येत नाही. टिपू सुलतानाच्या कालखंडात तुटलेले नाक जोडून देणारा (प्लास्टिक सर्जरी) माणूस रस्त्याच्या कडेला बसणारा लोहार होता, त्याला कुणी शिकवले? मूर्ती ते संपूर्ण देऊळ एकाच दगडात कोरून तयार करणाऱ्या शिल्पकारांजवळ ते ज्ञान कुठून आले?

भारत स्वतंत्र झाल्यापासून कुणीच कुणाला संस्कृत, वेद शिकण्यापासून अडवले नव्हते. किती लोक शिकले? किती ब्राह्मण जातीतले तरी शिकले? आता उपलब्ध असलेली कुठलीही साधने जवळ नसताना, किमान ७ ते ८ हजार वर्षांपूर्वी ग्रह, त्यांच्यातील अंतर, गती कमीत कमी फरकाने फक्त भारतीयांनी कशी मांडली? हजारो वर्षे त्याच्या चालत आलेल्या नोंदी आपल्याकडे आहेत, त्यात होणारे बदल, फरक यांच्याही नोंदी आहेत.

आपल्याला हे शिकवले जाते की, ते ग्रीकांनी आम्हाला दिले. ग्रीकांजवळची आकडेवारी व ते मोजण्याची पद्धत व आपली आकडेवारी व पद्धत यात प्रचंड फरक आहे. केवळ तेच नव्हे, धातूशास्त्र, गणित, बांधकाम, तत्त्वज्ञान, अध्यात्म, निसर्गचक्राचे ज्ञान आपल्याजवळ प्रगत अवस्थेत होते.

आज इतकी वाईट, अवनत स्थिती आहे की आपल्याजवळ काय ज्ञान होते, याची साधी माहितीही आपल्याला नाही. ती माहिती करवून देण्याची व्यवस्थाही क्रमिक शिक्षणात नाही. आपल्याला एवढेच माहिती आहे की, आपल्या पूर्वजांजवळ काहीच ज्ञान नव्हते, ज्यांच्यापाशी थोडेफार होते त्यांनी इतरांना त्यापासून वंचित ठेवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT