Mango Dainik Gomantak
ब्लॉग

'आंबा पिकतो रस गळतो, फळांचा राजा आता पुन्हा मोहरतो...'

दैनिक गोमन्तक

गोवा: देशाचे राष्ट्रीय फळ असणाऱ्या आंबा त्याच्या अवीट गोडीसाठी सर्वश्रुत आहे. प्रामुख्याने विषुववृत्तीय पट्ट्यात आंबा पीक चांगले येते. जगभरातील एकूण उत्पन्नापैकी निम्म्यापेक्षा जास्त उत्पन्न केवळ भारतात घेतले जाते. आंब्याच्या जगभरात तेराशेहून अधिक जाती असल्या तरी 25 ते 30 जाती व्यापारी दृष्टिकोनातून योग्य आहेत. आपल्या गोव्यात मानकूराद हा आंबा प्रसिद्ध असून त्याखालोखाल हापूस आणि पायरीची लागवड होते. असे असले तरी राज्यात 40 हून अधिक जातीचे आंबे आहेत. त्यांचा वापर ही वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो. महत्त्वाच्या आंब्यांच्या जातीबरोबर ग्रामीण भागात मिळणाऱ्या आंब्यांच्या जातींची चवही चाखली पाहिजे. प्रत्येक ठिकाणावरून त्या-त्या फळांमध्ये मिळणारे गुण व जीवनसत्वे वेगळी असतात.

४० मीटर पर्यंत उंची आणि दहा मीटरपर्यंत घेर असणारा आंबा सदाबहार वृक्ष आहे. सुरुवातीला कैऱ्या हिरव्या असतात आणि पक्व फळ बनताना त्या पिवळ्या, केशरी, लाल बनत जातात. त्याला इंग्रजीमध्ये 'मँगो' म्हणतात तर वनस्पतीशास्त्रीय नाव 'मांगीफेरा इंडिकाका' आहे. भारताबरोबरच पाकिस्तानचेही राष्ट्रीय फळ आंबा असून बांगला देशाने राष्ट्रीय झाड म्हणून आंब्याला गौरविले आहे. फिलीपाईन्स या देशाचे राष्ट्रीय चिन्हही आंबा आहे.

आयुर्वेदाबरोबर धार्मिक शास्त्रांमध्ये शुभ प्रसंगी, कलश पूजनात आंब्याच्या पानांचाही वापर होतो. आंबा थंड, आम्लयुक्त विविध प्रकारे जीवनसत्वयुक्त आहे.

आयुर्वेदानुसार लांबट आंब्यापेक्षा गोल आंबे जास्त चांगले असतात. बिनारेषेचे, चांगले पिकलेले,जास्त गर असलेले, लहान कोय असलेले तसेच पातळ सालीचे आंबे चांगले असतात. आंब्याची पाने चावून नंतर टाकून दिल्याने आवाज सुधारतो,खोकला कमी होतो, मुख दुर्गंधी कमी होते.

कैरीचा गर अंगास लावून आंघोळ केल्यास घामोळ्याचा त्रास कमी होतो. रक्तातिसारावर आंबा, अर्जुन व जांभूळ यांच्या सालींचे चूर्ण रात्री भिजत ठेवून सकाळी गाळून मध टाकून घ्यावे. मधुमेहामध्ये शुगर नियंत्रीत ठेवण्यासाठी आंब्याची कोवळी पाने रात्री पाण्यात भिजत ठेऊन सकाळी कुस्करून उपाशी पोटी प्यावे.

सांधा निखळणे, चमक भरणे किंवा लचकणे, उसण भरणे, पाय मुरगळणे यावर आंब्याचा डिंक, आंबेहळद, लिंबूरस आणि एरंडतेल हे सर्व एकत्र करून कमी अग्नीवर शिजवून नंतर याचा लेप करावा. खूप लवकर आणि चांगला गुण येतो. - अनिल पाटील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT