Freedom Dainik Gomantak
ब्लॉग

Freedom: जराशीच उघडीप...

जगण्याची मूलभूत गरज- अन्न, वस्त्र, निवारा आणि स्वातंत्र्य

गोमन्तक डिजिटल टीम

Freedom अवघ्या एका महिन्यात पावसाने शंभरी गाठली. रात्रंदिवस घनघोर बरसला. सारा महिना घर आणि कचेरी या व्यतिरिक्त इतरत्र पाऊल न टाकता आल्याने एक प्रकारच्या बंदीवासाची भावना साऱ्यांच्या मनात दाटून राहिली होती.

मात्र काल संध्याकाळी अचानक सूर्य थोडा वेळ ढगाआडून दिसला काय. हाडीमासी खिळलेला महिन्याभराच्या कोंदटपणाचा कोष कापरासारखा उडून गेला आणि झळाळत्या आकाशाच्या दिशेने फुलपाखरांनी उडावे तसे पटापट सारे मोकळ्यावर आले.

कितीतरी शृंखलानी माणूस जखडलेला असतो. पावसाळा खरे तर फार सुंदर असतो पण भिजण्याचे स्वातंत्र्य असेल तरच! अन्यथा, तो देखील एक शृंखलाच बनतो.

अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच स्वातंत्र्य हीदेखील माणसाची जगण्याची मूलभूत गरज आहे. मात्र त्याच्या मूल्याविषयी जे बोलले-लिहिले जाते ते फार संदिग्ध असते.

त्याचा अर्थही आकलनापलीकडे राहतो. पण जेव्हा प्रकाशाची तिरीप येते, दरवाजे उघडतात, बाहेरचे मोकळे अवकाश नजरेत भरते तेव्हा ‘स्वातंत्र्य’ या शब्दाला दुसऱ्या कुठल्याच व्याखेची गरज भासत नाही.

मोकळ्या प्रकाशित अवकाशाला सहज प्रेरणेने मिळालेला आपला प्रतिसाद हाच स्वातंत्र्याचा खरा उद्‍घाेष असतो आणि तोच आपली नजर दूरच्या क्षितिजाकडे वळवून आपल्याला काळोखाविरुद्ध उभे करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT