Mapusa Market: म्हापसा मासळी मार्केटातील भिंती रंगल्या पिचकाऱ्यांनी...

पालिकेचे दुर्लक्ष : दंडात्मक कारवाई करण्याची मागणी
Mapusa Market
Mapusa MarketDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Market म्हापसा येथील मासळी-मांस मार्केटची स्वच्छता तसेच देखरेखीकडे पालिकेने पूर्ण दुर्लक्ष केल्याने या परिसराला ओंगळवाणे स्वरुप आले आहे. येथील फुटपाथ, भिंती आदी ठिकाणे तंबाखूजन्य पदार्थाच्या पिचकारीने सध्या रंगलेल्या दिसत आहेत.

पालिकेने या विरोधात कारवाई करणे आवश्‍यक असून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पालिकेने मासळी- मांस प्रकल्पाच्या स्वच्छतेसाठी १० कामगारांची नियुक्ती केली आहे. तराही इमारतीच्या तळ व पहिल्या मजल्याची साफसफाई होत नाही.

इमारतीच्या जीन्यांची तर अनेक महिने स्वच्छताच केलेली नाही. त्यामुळे जीन्यांवर घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. इमारतीच्या तिन्ही बाजूच्या जीन्यांच्या बाजूच्या भिंती लोकांनी तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकून त्या रंगावल्या आहेत.

Mapusa Market
Farm To School Activities In Goa: ‘आयडीयल’चे विद्यार्थी गिरवताहेत 'शेती' विषयाचे धडे; ‘एनसीसी’चा अनोखा उपक्रम

पहिल्या मजल्यावरून काही चिकन-मटन विक्री दुकानदारांकडून आपले टाकाऊ साहित्य खाली तळमजल्याच्या खिडक्यांवरील छतावर गोणपाटातून टाकले जाते. हे गोणपाटही अनेक महिने उचलेले नाहीत.

त्यामुळे मार्केटच्या स्वच्छतेसाठी नियुक्त केलेले हे दहा सफाई कामगार कुठे काम करतात, असा प्रश्न मासळी विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे.

मार्केटमधील मासळी कापण्याच्या जागी भंगार कचरा टाकला आहे. याठिकाणी कित्येक वर्षे भंगाराचे साहित्य असून ते हटविलेले नाही. याशिवाय हा परिसर स्वच्छ केला जात नाही. त्यामुळे हे ठिकाण डासपैदासाचे केंद्र बनू शकते.

इमारतीच्या तळमजल्यावरील प्रवेशद्वारांची लोखंडी शटर गंजून तुटली आहेत. मासळी विक्री तळमजल्यावरील ट्युबलाईटही बंद स्थितीत आहेत. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी मार्केटमध्ये अंधार पसरला जातो.

Mapusa Market
Dharbandora Panchayat: जमीन दान दिली, मात्र पंचायतीला दिलेल्या आश्वासनांचं काय?

मार्केटची साफसफाई, नादुरुस्त विद्युत उपकरणे तसेच एकंदरीत डागडुजीवर पालिका मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्षांचे आम्ही लक्ष वेधले आहे. पण पालिकेकडून अद्याप याची दखल घेतलेली नाही.

शशिकला गोवेकर, मासळी विक्रेत्या संघटनेच्या अध्यक्षा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com