Portuguese in Goa Dainik Gomantak
ब्लॉग

Portuguese In Goa: पोर्तुगिजांचे पाय गोव्याच्या मातीत कुणी रोवले?

गोमन्तक डिजिटल टीम

सुशीला सावंत मेंडीस

प्रत्येक व्यक्तीला किंवा समुदायाला ते ज्या काळात, ज्या परिस्थितीत जगले त्याचा लाभ मिळालेला. इतिहास अशा उदाहरणांनी भरलेला आहे. मुसलमान, ख्रिश्‍चन किंवा युरोपीय लोक भारतात का आले?

व्यापार, सुपीक जमीन आणि इस्लाम व ख्रिश्‍चनिटी स्वीकारणारे लोक यांच्या शोधात ते आले. त्यांना उपलब्ध नसलेले विलासी जीवन येथे लाभेल या आशेनेही काही जण येथे आले. पोर्तुगीज आले ते ‘कुजस रिजन, इलियस रिलिजिओ’ - एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात क्रॉस घेऊन

केप ऑफ गुड होपला वळसा घालून १४९८मध्ये वास्को द गामा जेव्हा कालिकतजवळच्या कपाड समुद्रकिनाऱ्यावर उतरला तेव्हा, ‘अल्मास ई स्पेसिएरिया’ (आम्ही ख्रिश्चन होतील असे लोक आणि मसाले शोधण्यासाठी येतो) हे त्याचे शब्द होते.

युरोप आणि भारत यांना जोडणारा सागरी मार्गही त्याने शोधला. माझ्या लिखाणाच्या आधी, दोन आठवड्यांपूर्वी मी लिहिलेल्या ‘तिमय्या राष्ट्रद्रोही कसा?’ हा लेख लिहिला होता.

इतिहासाचा भार असणारी आणखी एक व्यक्ती म्हणजे वेर्ण्याचे सरदेसाई, म्हाळ पै वेर्णेकर. पिसुर्लेकरांनी पुष्टी केल्याप्रमाणे, असे म्हणता येईल की, गोव्यातील हिंदूंच्या आमंत्रणावरूनच अफोंसो डी अल्बुकर्कने गोव्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला.

इजिप्तच्या सुलतानाच्या मदतीने युसूफ आदिल शाहने एला बंदरात डॉक-यार्ड बांधण्यास सुरुवात केली. घोड्यांच्या व्यापारात आडकाठी निर्माण केल्याबद्दल मुस्लीम नौकायनांना होनावर आणि भटकळच्या विजयनगर बंदरातून हद्दपार करण्यात आले.

पोर्तुगीजांचे विजयनगर राज्याशी घोड्यांचा व्यापार व इतर अनेक कारणांमुळे मैत्रीपूर्ण संबंध होते; परिणामस्वरूप यात परस्परांचा फायदा होता. त्यामुळे नवायथांनी आदिल शाहच्या प्रदेशात आश्रय घेतला.

हिंदू जमीनदारांना नागरी आणि लष्करी अधिकार देऊन त्यांनी गोव्यावर आपली सत्ता बळकट केली. त्यांनी ‘सरदेसाई’ यांसारख्या पदव्या बहाल केल्या, जे आदिल शाहच्या नेतृत्वाखाली लष्करी अधिकारी आणि सरदार बनले.

विशेषत: सारस्वत, जसे की सूर्यराव सरदेसाई, विश्वासराव सरदेसाई इत्यादी. काहींना मिळालेल्या अधिकारांचा इतका माज चढला होता की, लोकांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी होती.

प्रा. प्रतिमा कामत त्यांच्या ‘फारार फार’ या पुस्तकात लिहितात की, ‘आदिल शाहने या बेमुर्वतखोरांना संरक्षण दिल्यामुळे, गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला’. कारण हे लोक स्थानिक हिंदूंना वारंवार त्रास देत होते.

याचा परिणाम म्हणून म्हाळ पै वेर्णेकर यांनी तिमाजीसह अफॉन्सो डी अल्बुकर्कला गोव्यावर आक्रमण करण्याचे आमंत्रण दिले. आणखी एक मतप्रवाह असा आहे की, जमीन कर आदिल शाहने वाढवला होता आणि म्हणून म्हाळ पै यांनी १५१०मध्ये त्याच्याविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले होते.

‘कोकणाख्यान (ऊर्फ दक्षिणनाट्य सारस्वत ब्राह्मणाख्यान)’ यात म्हाळ पै वेर्णेकर यांचे वर्णन वेर्ण्यातील एक शक्तिशाली सरदेसाई असे करण्यात आले आहे. त्यांच्या आधिपत्याखालील जमिनींमध्ये जांबावली, सासष्टी, पंचमहाल, शिलवेश्‍वर, कुडाळ, बेलूर, चंद्रवाडी आणि खानापूर येथील जमिनींचा समावेश होता.

प्रा. कामत यांनी मौखिक इतिहासातील लोकप्रिय म्हणींचे संकलन केले आहे. यातील एक म्हण, ‘म्हाळ पैक जोर आनी सगल्या संग्रामाक पेज’, अशी आहे. म्हाळ पै यांना ताप आला तर सगळा प्रांत पेज जेवतो. आणखी एक प्रचलित म्हण आहे,

‘गोंयची भुईं, हें म्हाळ पैचे घर’(गोव्याचा प्रदेश म्हणजे म्हाळ पै यांचे घर).

प्रथम युसुफ आदिल शाहच्या पाठिंब्याने एलाच्या नवायाथ समुदायाने त्यांच्या लोकांचा छळ केल्यामुळे म्हाळ पै यांनी पोर्तुगिजांकडून मदत घेण्याचे ठरवले. कोकणाख्यानातील ४ श्लोक, म्हाळ पै यांनी नवायाथांविरुद्ध दिलेल्या लढ्याबद्दल आणि टोपीकरांना किंवा पोर्तुगीजांना दिलेले आमंत्रण याबद्दलचे आहेत.

‘त्यांनी आपुलें समयेसी, टोपीकर अविंध्य होते कोचिस्ट’. मजकूर पुढे सांगतो की म्हाळ पै यांनी कोचीनमधील पोर्तुगिजांना लेखी आमंत्रण दिले होते. तिमाजीच्या मदतीने त्याने पोर्तुगीजांशी संपर्क साधल्याचे अनेक इतिहासकार लिहितात. १५१०मध्ये अफॉन्सो डी अल्बुकर्कने गोवा जिंकल्यानंतर, म्हाळ पै यांना त्यांच्या सेवेबद्दल एला जवळच्या करमळी गावाजवळ जमीन देऊन सन्मानित करण्यात आले.

पोर्तुगीजांकडून महत्त्वाच्या पदी नियुक्तीची वर्षानुवर्षे वाट पाहिल्यानंतर आणि त्यांच्या ख्रिस्तीकरणाच्या कट्टर धोरणाबद्दल नाराज झाल्यानंतर, म्हाळ पै यांनी आदिल शाह यांच्याशी गुप्त युती करून पोर्तुगीजांचा पाडाव करण्याचा निर्णय घेतला.

पिसुर्लेकर त्यांच्या ‘कोलाबोरॅडोर्स हिंदू’ या पुस्तकात गोव्यातील हिंदू (विशेषत: ब्राह्मण आणि आदिल शाह) यांच्यातील घनिष्ठ व मैत्रीपूर्ण सहकार्याबद्दल लिहिले आहे.

त्यामुळे म्हाळ पै हे असे गोमंतकीय होते, ज्यांनी प्रथम अफोंसो डी अल्बुकर्क यांची आदिलशाहीविरुद्ध मदत मागितली व त्यानंतर दोन दशकांहून अधिक काळ पोर्तुगीजांच्या फूट पाडा आणि राज्य करा या धोरणाला कंटाळून त्यांनी गोव्याला पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यात मदत करण्याच्या उद्देशाने आदिल शाह यांच्याशी गुप्त मसलती केल्या.

१५३४-३५ मध्ये गोव्यावर झालेल्या विजापुरी हल्ल्यामागे म्हाळ पै यांचा हात असल्याचा सुगावा पोर्तुगीजांना लागल्याची माहिती गॅस्पर कोरियासारखे पोर्तुगीज इतिहासकारांनी नमूद करून ठेवली आहे.

त्यामुळे, म्हाळ पै यांना गोव्यातील त्यांच्या इतर काही हिंदू साथीदारांसह कोचीनला पळून जावे लागले. करमळी गावाच्या अगदी बाहेर असलेली त्याची जमीन तेव्हा पोर्तुगीज गव्हर्नर नुनो दा कुन्हा याने जप्त केली होती.

पोर्तुगीजांनी ही जप्त केलेली जमीन गोवा शहरातील नगरपालिकेचे कारकून दिओगो मोनिझला भेट म्हणून दिली. म्हाल पै मात्र पोर्तुगीजांना गोव्यातून हुसकावून लावण्याच्या त्यांच्या कार्यात कधीही यशस्वी झाले नाहीत.

आपल्या कर्मांचे परिणाम त्यांना भोगावे लागले. विजयनगरची राजवट संपवण्यासाठी आणलेल्या पोर्तुगिजांना संपवण्यासाठी पुन्हा विजयनगर साम्राज्याशी जुळवून घ्यावे लागले. ज्या कोचिनहून त्यांनी पोर्तुगिजांना आमंत्रित केले होते, त्याच कोचिनमध्ये त्यांना आपले उर्वरित आयुष्य घालवावे लागले.

राजा पोरस जर अलेक्झांडर द ग्रेटला भेटला नसता आणि त्याच्या ‘इंडिका’ या पुस्तकात या ऐतिहासिक भेटीची नोंद करण्यासाठी मेगास्थिनीस उपस्थित नसता तर इतिहासाने कोणते वेगळे वळण घेतले असते?

त्याचप्रमाणे म्हाळ पै वेर्णेकर व तिमय्या यांनी पोर्तुगिजांना आमंत्रण दिले नसते तर गोव्यासारख्या आपल्या छोट्या राज्याचा इतिहास वेगळा झाला नसता का? म्हाळ पै वेर्णेकर आणि तिमाजी यांच्या मदतीशिवाय पोर्तुगिजांना गोव्याच्या मातीत पाय रोवता आले असते का?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT