Arjun Tendulkar IPL Auction 2025: 'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरला IPL 2025 च्या मेगा लिलावात मोठा झटका बसला होता. जेव्हा त्याचे नाव पहिल्यांदा समोर आले, तेव्हा त्याला कोणत्याही टीमने घेतले नव्हते. पण दुसऱ्यांदा त्याचे नाव आल्यावर मुंबई इंडियन्सने त्याला संघाचा भाग बनवले. मुंबईने अर्जुन तेंडुलकरचा 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या संघाचा भाग बनवले.
दरम्यान, अर्जुनला आयपीएलमध्ये 5 सामने खेळायला मिळाले, ज्यात त्याने केवळ 3 विकेट घेतल्या होत्या. त्याचवेळी, आयपीएलच्या 17 व्या हंगामाच्या मेगा लिलावापूर्वी मुंबईने त्याला रिलीज केले होते. 30 लाखांच्या बेस प्राईससह मेगा लिलावात सहभागी झालेल्या अर्जुनमध्ये कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. मात्र, दुसऱ्यांदा आलेल्या अर्जुनच्या नावावर मुंबई इंडियन्सने मोहोर उमटवली.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी सर्व खेळाडू फ्रँचायझींचे लक्ष वेधण्यात व्यस्त होते. अनेक खेळाडूंनी संघांचे लक्ष वेधून घेतले आणि ते करोडपती झाले. पण मेगा लिलावापूर्वी अर्जुन तेंडुलकरची कामगिरी काही खास नव्हती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अर्जुनला सुवर्णसंधी होती, पण विशेष कामगिरी करण्यात तो यशस्वी ठरला नाही. अपेक्षेच्या विरुद्ध अर्जुनने या स्पर्धेत महागडा स्पेल टाकला. त्याने 4 षटकात 48 धावा दिल्या. या काळात त्याच्या गोलंदाजीतून काही खास दिसले असते तर संघ त्याच्यावर लावू शकले असते.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी वैभव सूर्यवंशीची झाली. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी वैभव करोडपती झाला. सचिन-सेहवागचा विक्रम मोडण्यासाठी वैभव अजूनही दावेदार आहे. राजस्थान रॉयल्सने वैभवला 1.1 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट करुन घेतले. अलीकडेच, वैभवने अंडर-19 ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध विक्रमी शतक झळकावले होते, त्याचा फायदा त्याला आयपीएल लिलावात झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.