Inscription  Dainik Gomantak
ब्लॉग

Inscription In Goan Temple: नागेशीतील 1413 चा शिलालेख

विजयनगरचा राजा देवराय - पहिला याच्या आधिपत्याखाली जो गोवा होता, त्या काळात हा शिलालेख कोरला गेला.

गोमन्तक डिजिटल टीम

सर्वेश बोरकर

निसर्गसंपन्न गोवा राज्यात फोंड्याच्या किंवा अंत्रुज महाल येथील बांदिवडे नागेशी या ऐतिहासिक गावात श्रीनागेश महारुद्र हे एक प्राचीन मंदिर आहे. हे ऐतिहासिक मंदिर फर्मागुडी-कवळे रस्त्यावर फर्मागुडीपासून सुमारे ८०० मीटर अंतरावर स्थित आहे.

नागेशी गावाला तिन्ही बाजूंनी डोंगर रांगांनी वेढलेले आहे, तर चौथ्या बाजूला अघनाशिनी नदी वाहते. गावाच्या दोन्ही बाजूंनी एक नाला वर्षभर वाहतो. हिरवीगर्द शेते व आजूबाजूच्या टेकड्यांमध्ये सुपारीच्या लागवडीसह अनेक ठिकाणी झरे वाहताना आढळतात.

मंदिर पश्चिमाभिमुख असून समोर मंदिराचा मोठा तलाव आहे व येथील पाणी नेहमीच वाहते आणि स्वच्छ असते. श्रीनागेश महारुद्र मंदिराच्या पाण्याच्या तलावापासून बांदिवडे येथे श्रीजगदंबा महालक्ष्मीचे मंदिर फक्त ३०० मीटर अंतरावर आहे.

श्रीनागेश महारुद्र मंदिराच्या सध्याच्या समिती कार्यालयाच्या भिंतीवर लावलेला दगडी शिलालेख मध्ययुगीन काळातील दोन्ही मंदिरांचे वैभव सांगतो. हा शिलालेख शके १३३५ म्हणजे इ. स. १४१३तला आहे. विजयनगरचा राजा देवराय - पहिला याच्या आधिपत्याखाली जो गोवा होता त्या काळात हा शिलालेख कोरला गेला.

शिलालेखाच्या दगडावर वरच्या बाजूने घुमटाच्या आकाराची रचना आहे. मजकुराच्या वर मध्यभागी एक लहान शिवलिंग आहे व सूर्य आणि चंद्राची आकृती स्पष्ट दिसते. शिलालेखाची सुरुवात श्रीगणपतीच्या आवाहनाने होते.

पुढे त्यावर विजयनगरचा राजा देवराय - पहिला याचे वर्णन, ‘महाराजाधिराज परमेश्वर श्री वीर प्रताप देवराय महाराज विजयनगरचे शासक’ असे केले आहे. त्यात नंजण गोसावी यांचाही उल्लेख आहे, जो गोव्याचा त्या काळात विजयनगरचा राज्यपाल होता.

या शिलालेखातून गावातील सामाजिक जीवनाची माहिती मिळते. गावकऱ्यांनी नियम आणि कायदे लोकांकडून पाळले जात असल्याची ग्वाही कशी दिली, हेही दिसून येते. शिलालेख पुढे म्हणतो की, कुंकळ्ळी येथील पुरुष शेणवी वागळे यांचा मुलगा माई शेणवी वागळे याला राम नायक, प्रतापराव सरदेसाई यांनी काही विशेषाधिकार बहाल केले होते.

शिलालेख मोजमापनावरदेखील प्रकाश टाकतो. विशेष म्हणजे तेलासारखे द्रव भांड्यांमध्ये (तांबे) मोजले जात असे. बहुधा एका विशिष्ट आकाराचे भांडे होते, जे तेल मोजण्यासाठी वापरले जात होते. शिलालेखात नमूद केलेले मोजमापाचे दुसरे साधन म्हणजे ‘गिध’. याचा उपयोग तूप मोजण्यासाठी केला जात असे.

बांदिवडेचे सरदार नागन नायक, प्रतापराव सरदेसाई व गावाच्यावतीने राम प्रभू आणि मंगेश प्रभू यांचा त्यात उल्लेख आहे आणि म्हटले आहे की एका विशिष्ट गोपाल भट्टाने वेदखंडिकेचा (बागेचे नाव) हक्क उपभोगावा, ज्याच्या बदल्यात त्यांनी १२ भांडी(तांबे) तेल आणि २ टांक(त्या काळात गोव्यात वापरल्या जाणाऱ्या ‘टांक’ नावाच्या चलनाचा प्रकार) देवता श्रीमहालक्ष्मीला द्यावे.

माई शेणवी वागळे यांनी गावाला २० टांक भेट दिले आणि फळबागेवर आकारलेले सर्व कर माफ केले. माई शेणवी वागळे यांनी असेही ठरवले की गोपाल भट्ट यांनी दरवर्षी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री मंदिरासमोरील दीपमाळ प्रज्वलित करण्यासाठी विशिष्ट प्रमाणात तेल द्यावे.

याशिवाय गोपाल भट्ट यांनी श्रीनागेश देवाला धूप अर्पण करून तांदूळ, आठ प्रकारच्या भाज्या, वडे आणि घारयो तयार करण्याची व्यवस्था करावी. या व्यतिरिक्त पृथ्वीवर सूर्य आणि चंद्र अस्तित्वात असेपर्यंत वरील विधी करावा यासाठी माई शेणवी वागळे यांनी गोपाल भट्ट यांना साडेतीन टांक दिले.

या व्यतिरिक्त काही विशेषाधिकार रावलू गिडू वलीमार यांना देण्यात आले होते. या विशेषाधिकारांच्या बदल्यात त्यांनी ‘दीपमाळ’ कायमस्वरूपी पेटवायची होती. माई शेणवी वागळे यांनी विठ्ठल शेणवी यांना रुवो कुलागर (रुवो नावाची बाग) ही बाग भेट म्हणून दिली.

ज्याच्या बदल्यात सकाळी मंदिरात ‘आटवल’ (तांदळाचा गोड पदार्थ), भात आणि तूप द्यायचे. लोकांच्या खाण्याच्या सवयी आणि पदार्थ यांचाही उल्लेख शिलालेखात आढळतो. तळलेल्या खाद्यपदार्थांची नावे शिलालेखात स्पष्टपणे नमूद केलेली आहेत. आजही ‘वडे’ हे स्वादिष्ट पदार्थ मानले जात असले तरी घारयो हा पदार्थ हळूहळू नामशेष होत आहे.

शिलालेखाचा शेवट एका संस्कृत मजकुराने होतो की, ‘जो शिलालेखाचे अनुसरण करतो तो श्रेष्ठ आहे आणि त्याला शाश्वत दर्जा प्राप्त होईल’.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT