Katia Goes Dainik Gomantak
ब्लॉग

Monsoon Memories: मान्सून, मी आणि ‘नॉस्टाल्जिआ’

‘नॉस्टाल्जिआ’ म्हणजे भूतकाळातील काही क्षणांबरोबरचा उत्कंठपूर्ण स्नेह’ असे काहीसे वाचनात आले आणि माझ्याच भावना शब्दात उतरवण्याऱ्या त्या अनाम व्यक्तीबद्दल माझ्या मनात अपार कृतज्ञता दाटून आली.

गोमन्तक डिजिटल टीम

कात्या गोएस, स्तंभलेखिका

Nostalgia आपण रोज शेकडो भावना अनुभवत असतो. त्यातील काही पुसट होत लुप्त होतात आणि काही बराच काळ आपल्या मनात तरंगत राहतात. दीर्घकाळ मनात तरंगून राहणाऱ्या भावना एक प्रकारे नॉस्टाल्जिआ असतात.

बराच काळ नॉस्टाल्जिआ ही संकल्पना माझ्यासाठी गुंतागुंतीची होती पण एके दिवशी तो शब्द गुगल करता, ‘नॉस्टाल्जिआ’ म्हणजे भूतकाळातील काही क्षणांबरोबरचा उत्कंठपूर्ण स्नेह’ असे काहीसे वाचनात आले आणि माझ्याच भावना शब्दात उतरवण्याऱ्या त्या अनाम व्यक्तीबद्दल माझ्या मनात अपार कृतज्ञता दाटून आली.

ॲलिडा न्‍युजेंट हिने लिहिलेल्या ओळी एकदा वाचनात आल्या होत्या- ‘लिंबू सरबताची तहान तुम्हाला अजूनही आहे पण त्याची चव पुर्वीसारखी तुम्हाला सुखवत नाही. तुम्हाला उन्हाळा हवासा वाटतो पण तो तुमच्या मनातला पंचवीस वर्षांपूर्वीचा उन्हाळा असतो.'

तिने अगदी खरे लिहिले आहे आणि तुम्ही जर विचार केला तर लक्षात येईल की प्रत्येक कथा बालपणीच्या नॉस्टाल्जियावर शिजलेली असते कारण जीवनाची सुरुवात तेव्हाच होत असते.

मान्सूनचा नॉस्टाल्जिया मात्र वेगळा असतो. जीवनातल्या सोप्या काळाची ती आठवण असते. शाळा सुरु झालेल्या असतात आणि ढगांचा गडगडाट हा सकाळी उठवणारा अलार्म असतो. नवीन गोष्टींनी सजलेल्या शाळेत जाणे ही गंमत असते पण ही गंमत आपली छत्री हरवेपर्यंतच टिकते.

घरी पोहचून बसच्या खिडकीतून रस्त्यावर मला दिसलेल्या शंभर गोष्टी मी आईला सांगायचे पण जेव्हा खिडकीशेजारी जेव्हा बसायला मिळत नसे तेव्हा माझे उत्सुक डोळे डावी-उजवीकडे होणाऱ्या वायपरच्या साध्या हालचाली बघत रहायचे.

वर्षातील प्रत्येक ऋतू नॉस्टाल्जियाचा एक झोत आपल्याबरोबर घेऊन येतो आणि आपला हात धरून कित्येक ओळखीच्या गल्ल्या फिरवून आणतो.

अनेक वेळा सर्व रस्ते ‘घरा’च्या दिशेलाच वळलेले असतात तर काही वेळा, ॲलिडा म्हणते त्याप्रमाणे, 'घर हे घरच असते- दहा वर्षांपूर्वीचे!' कदाचित हा निसर्गाचाच भाग असेल किंवा जीवनाचा साधा मार्ग पण मी वाचले आहे त्यानुसार, सर्व काही 'शेवटी' जुळले जाते.

काल मी रस्त्यावरून जाताना बसच्या खिडकीतून बाहेर न्याहाळणारे दोन डोळे पाहिले. ते माझ्या डोळ्यांसारखे अजिबात नव्हते. पण मला ठाऊक आहे, पावसाळ्यातील नॉस्टाल्जिक गीताशी ते पुढे कधीतरी जुळले जातील..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कर्नाटकातील दोन युवकांना अटक, वास्को पोलिसांची कारवाई

Supermoon 2025: आकाशातील अद्भुत क्षण! आज गोव्यातून दिसणार 'सुपरमून', कुठे किती वाजता पाहता येईल?

Actress Sandhya: ए मालिक तेरे बंदे हम! भारतीय चित्रपटसृष्टीच्या महान पर्वाच्या साक्षीदार 'संध्या'

Punav Utsav: देव भगवतीच्या चव्हाट्यावर येतात, मंगलाष्टके म्हणून ‘शिवलग्न’ लावले जाते; पेडणेची प्रसिद्ध 'पुनाव'

Goa Agriculture: 'थोडा अभ्यास वाढवला, सरकारने सहकार्य केले तर गोव्यात मुबलक भाजीपाला पिकेल'; कृषी राजदूत 'वरद'चे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT