Khola beach- Canacona: नवविवाहितांसह विदेशी पर्यटकांसाठी रोमँटिक डेस्टिनेशन

डोंगर खडकांवरून थेट समुद्रात डोकावणाऱ्या माडांची रांग लाभलेला काणकोण तालुक्यातील खोल गावचा समुद्रकिनारा अवर्णनीय आहे
Khola beach
Khola beachDainik Gomantak
Published on
Updated on

Khola beach- Canacona पावसाळ्यातल्या दिवसात गोव्याचा कुठला भाग सुंदर दिसतो असा प्रश्‍न एखाद्याला केल्यास पश्‍चिम घाटाचा, रानावनांनी समृध्द असलेला भाग हा पावसात अवर्णनीय रित्या सुंदर बनलेला असतो असे उत्तर आपल्याला मिळेल.

वर्षातील इतर काळात मात्र समुद्र किनाऱ्यांना तोड नाही असा साऱ्यांचाच समज असतो. गोव्यातील काही किनारे मात्र त्याला अपवाद आहेत. डोंगर खडकांवरून थेट समुद्रात डोकावणाऱ्या माडांची रांग लाभलेला काणकोण तालुक्यातील खोल गावचा समुद्रकिनारा हा त्यापैकी एक आहे.

Khola beach
Artist: नियतीने घडवलेली चित्रकार- क्लेरीस वाझ

होय तोच किनारा जिथली ‘खोला मिरची’ जगभर प्रसिध्द आहे, पावसाळ्‍यात देखील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनून आहे. काब-द-राम किल्ल्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ह्या किनाऱ्यावर पोहचण्यासाठी पर्यटकांना दगड-दरडीवरून सुमारे ३०० मीटर चालत जावे लागते.

पण किनाऱ्यावर एकदा पोहचल्यानंतर भव्य सागर, सफेद रेती, फेसाळणाऱ्या लाटा, दुरवर पसरलेले माडांचे क्षेत्र अशा अनुपम दृश्‍यांची साखळी ह्रदयाला भारून टाकते. निसर्गाच्या त्या जादुभऱ्या विश्‍वात भान सांभाळणे कठीणच असते.

Khola beach
Quepem: कच्चा रस्ता, व्हिडीओ, धरणे आणि दखल

तिथल्या पर्यटक कुटीरांमध्ये निवास करणे अनेक पर्यटक पसंत करतात. या किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांमध्ये, विदेशी पर्यटक तसेच उत्तर भारतीय पर्यटकांची संख्या अधिक असते. नवविवाहित जोडप्यांसाठी तर एकांत स्थळी विसावलेला आणि वर्दळ विरहित असलेला हा किनारा जणू स्वर्गातील रोमॅंटिक अक्षांस रेखांशावर वसलेला आहे.

पावसात कोसळणारा धबधबा, जवळच असलेल्या गोड पाण्याचा औषधी झरा, कातळावर फुललेली शेती ही या परिसरातील वैशिष्ट्ये पर्यटकांना अधिक रोमांचित करतात. धुंवाधार पावसातही खोल किनारा त्यामुळे पर्यटकांनी बहरलेला असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com