Deval Devi  Dainik Gomantak
ब्लॉग

History Of India: राजपुतान्यात सती प्रथेची सुरुवात

अत्यंत चिडलेल्या राजा कान्हा दादा वाघेलाने हे मान्य केले आणि आपल्या मुलीला देवगिरीच्या किल्ल्यावर पाठवायचा ठरवले.

गोमन्तक डिजिटल टीम

सर्वेश बोरकर

दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिल्जीने १२९९मध्ये आक्रमण केले व फार कमी वेळात गुजरात सहज काबीज केला. जैन इतिहासकार जीनप्रभा सुरी सांगतात की, खिल्जीच्या सैन्याने आशापल्ली (सध्याचे अहमदाबाद) येथे श्रीकान्हाच्या(कर्ण देव) सैन्याचा पराभव केला.

राजा कर्ण देवाला त्याच्या मंत्र्यांनी देश सोडून पळून जाण्याचा आणि आक्रमणकर्ते निघून गेल्यावर परत येण्याचा सल्ला दिला. कर्ण आपली राणी कमला देवी आणि कुटुंबासह दक्षिणेकडे पळून गेला.

त्याची राणी कमला देवी आक्रमणकर्त्यांच्या हाती सापडली आणि तिला सुलतान अलाउद्दीन खिल्जीकडे लूट व गुलाम म्हणून दिल्लीला बळजबरीने हरममध्ये पाठवण्यात आले. दरम्यान, दिल्लीच्या सैन्याने अनाहिलावाडा (आधुनिक पाटण), खंभात, सुरत आणि सोमनाथसह गुजरातमधील श्रीमंत शहरे आणि मंदिरे लुटली.

अनाहिलावाड(आधुनिक पाटण) गुजरातचा राजा कान्हा दादा वाघेलाने(कर्ण देव) महाराष्ट्रातील यादव घराण्याची राजधानी देवगिरी येथे आश्रय घेतला. हे ठिकाण भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबादजवळ आहे.

त्याचा शासक होता रामदेवराय यादव, ज्याचे राज्य गोव्यापर्यंत पसरले होते, त्यावेळच्या गोव्याचे दुर्बळ राज्यकर्ते श्री शास्तादेव कदंब - तिसरे (१२४६-१२६५) आणि श्री कामदेव (१२६५-१३१०) देवगिरीचे सामंत बनले होते.

१२३८मध्ये राजकीय सत्तापरिवर्तन यादव शासक सिंघान यादव यांच्या बाजूने झाले आणि त्रिभुवनमल्ल कदंब(१२१६-१२३८) यांनी आपले गोव्याचे राज्य गमावले व ते यादवांचे सामंत बनले.

पळून जाणाऱ्या अनाहिलावाड, गुजरातचा राजा कान्हा दादा वाघेला यांना रामदेवराय यादवने आश्रय दिला आणि या निर्वासित राजाला जवळची काही गावे देण्यात आली. वाघेलाची मुलगी राजकन्या देवल देवी देवगिरीमध्ये वाढली आणि तिच्या सौंदर्याची बातमी अल्लाउद्दीन खिलजीच्या राजवाड्यात पोहोचली.

कान्हा दादा वाघेला यांची पत्नी राणी कमला देवी आता तिसरी पत्नी म्हणून अलाउद्दीन खिल्जीशी विवाहबद्ध झाली होती. तिने सुलतानला सांगितले की तिला तिच्या लहान मुलीची म्हणजे देवल देवीची आठवण येते.

१३०८मध्ये, आई आणि मुलगी विभक्त झाल्यानंतर दहा वर्षांनी, खिलजी सुलतानने देवल देवीला परत आणण्याच्या सूचनांसह त्याच्या आवडत्या सेनापती मलिक काफूरच्या नेतृत्वाखाली दख्खनला एक मोहीम पाठवली.

राजा कान्हा दादा वाघेलाने यादवांकडून मदत मागितली, ज्यांनी राजपूत वाघेलाची मुलगी राजकन्या देवल देवी यादव राजपुत्राशी लग्न करण्याच्या अटीवर परवानगी दिली.

अत्यंत चिडलेल्या राजा कान्हा दादा वाघेलाने हे मान्य केले आणि आपल्या मुलीला देवगिरीच्या किल्ल्यावर पाठवायचा ठरवले. नववधूच्या रूपात सजलेल्या, राजकुमारी देवल देवीला पालखीत बसवण्यात आले आणि राजकुमाराशी लग्न करण्यासाठी देवगिरीच्या किल्ल्यावर पाठवण्यात आले.

तथापि, किल्ल्यावर पोहोचण्यापूर्वी, मलिक काफूरच्या सुलतानी सैनिकांच्या तुकडीने अपघाताने एलोरा लेण्यांजवळ राजकुमारीला पकडले. राजकुमारी देवल देवी यांना दिल्लीला बळजबरीने हरममध्ये गुलाम म्हणून पाठवण्यात आले, जिथे तिची आई कमला देवीशी तिची पुन्हा भेट झाली, ज्यांना त्यांनी लहानपणापासून पाहिले नव्हते. काही काळानंतर, अलाउद्दीनचा मोठा मुलगा खिजर खान तिच्या प्रेमात पडला.

१३१६ मध्ये सुलतान अलाउद्दीन खिलजीच्या मृत्यूनंतर, त्याचा तिसरा मुलगा मुबारक शाह सिंहासनावर बसला. मुबारक शाहला त्याच्या हत्येचा कट रचल्याची माहिती मिळाली, त्याने त्याचा भाऊ खिजर खानसह कटात सामील असलेल्या सर्वांना ठार मारले.

इतिहासकार हाजी-उद-दबीर लिहितात की मुबारक शाहने देवल देवीला बळजबरीने आपल्या हरममध्ये गुलाम म्हणून नेले आणि नंतर तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले; अशा प्रकारे तिचा तो दुसरा पती झाला.

पुढे १३२०च्या एका रात्री मुबारक शाहची त्याच्या आवडत्या प्रियकराने म्हणजे खुसरो खानने हत्या केली. झियाउद्दीन बरानी, समकालीन इतिहासकार, लिहितात की खुसरो खानने नंतर देवल देवीशी लग्न केले, त्यामुळे तो तिचा तिसरा पती झाला.

मुख्य म्हणजे खुसरो खान हा एका राजपूत कुटुंबात जन्मलेला, तो लहान असताना एका लढाईत पकडला गेला होता, त्याला दिल्लीत मलिक शादीने मुस्लीम म्हणून वाढवले होते. त्याच्या चांगल्या दिसण्याने त्याला सुलतान मुबारक शाहची मर्जी प्राप्त झाली होती.

तथापि, केवळ पाच महिन्यांच्या कारकिर्दीनंतर, गियाथ-अल-दीन तुघलककडून खुसरो खानचा पराभव झाला आणि त्याला ठार मारण्यात आले. एका हिंदू वंशाच्या राजपूत राजकन्येची क्रूर, संहारक आक्रमणकर्त्यांच्या मालिकेत एका हातातून दुसऱ्या हातात हस्तांतरित होण्याची तिची कथा, ही भारतातील राजपूत शासकांच्या अगतिकतेची पराकाष्ठा व सती प्रथेची सुरुवातही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

SCROLL FOR NEXT