Goa Election 2022: बाणावलीत चर्चिल बॅकफूटवर! Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Election 2022: बाणावली मतदारसंघात चर्चिल बॅकफूटवर!

‘आप’चा वाढता बोलबाला; जिल्‍हा पंचायत निवडणुकीनंतर वाढला आत्‍मविश्‍वास मतविभाजनाचा लाभ नक्की कुणाला? उमेदवारांची लागणार कसोटी

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: आतापर्यंत बाणावली मतदारसंघ हा आपला बालेकिल्ला असे सांगत आलेल्या चर्चिल आलेमाव यांच्यासमोर यावेळी काँग्रेस आणि ‘आप’ या दोन्ही पक्षांकडून जबरदस्त आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. एकेकाळी ज्यांना बाणावलीचे ‘बेताज बादशहा’ असे संबोधले जायचे ते चर्चिल आलेमाव हे बॅकफूटवर गेले आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर मत विभागणी झाली तरच त्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

वाढते वय आणि त्यामुळे नव्या मतदारांकडे तुटलेला संपर्क या दोन गोष्टी चर्चिलच्या विरोधात जाण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात येत आहे. त्यांची ही जागा कदाचित आम आदमी पक्षाचे उमेदवार कॅ. वेंझी व्हिएगस हे भरून काढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या मतदारसंघातून चर्चिल आलेमाव हे चारवेळा जिंकून आले असले, तरी यापूर्वी तीन वेळा त्यांना आणि एक वेळी त्यांची कन्या वालांका आलेमाव यांना या मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बाणावली मतदारसंघात आपने आपले प्रचारकार्य जोमाने सुरू केले आहे. गेल्‍या महिन्‍यात बाणावली समुद्रकिनारा काळवंडला होता. सर्वप्रथम आपने पुढाकार घेऊन किनाऱ्याची स्‍वच्छता मोहीम राबविली. मात्र, श्रेयवादामुळे चर्चिल यांनीही कार्यकर्त्यांमार्फत स्‍वच्छता मोहीम राबवून लक्ष वेधले होते.

चर्चिलची उतरती लोकप्रियता?

एकेकाळी या मतदारसंघात चर्चिल आलेमाव हे मतदारांच्या गळ्यातील ताईत होते. कुठल्याही पक्षाच्या उमेदवरीवर निवडणूक लढविली तरी जिंकून येतात, अशी त्यांची ख्याती होती. मात्र, 2002 साली त्यांना मिकी पाशेको यांनी ‘अस्मान’ दाखविले आणि त्यांची लोकप्रियता उतरू लागली. यानंतर तब्बल 15 वर्षे ते बाणावलीत जिंकून येऊ शकले नव्हते. मात्र, 2017 मध्ये काँग्रेसने मुद्दामहून कमकुवत उमेदवार रिंगणात उतरविला त्यामुळेच त्यांना विजय मिळू शकला. यंदा जिल्हा पंचायत निवडणुकीत चर्चिल आपला उमेदवार बाणावलीतून निवडून आणू शकले नाहीत. त्यांची भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी असलेली सलगीही या निवडणुकीत त्यांच्या विरोधात जाऊ शकते. मात्र, भाजपसोबत केलेली सलगी मतदारसंघाच्‍या विकासासाठी केल्‍याचा दावा त्‍यांनी अनेकदा केला आहे.

‘आप’चा जोरदार प्रचार

बाणावली मतदारसंघात आम आदमी पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांची फळी बऱ्यापैकी उभारली असून त्याच्याच जोरावर या पक्षाने यंदा जिल्हा पंचायत निवडणुकीत बाणावलीची जागा सर केली होती. त्यामुळे आप कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला असून यावेळी कॅ. वेंझी व्हिएगस या आक्रमक युवा उमेदवाराला आप रिंगणात उतरविणार असल्याने बाणावलीत तोडीसतोड उमेदवार उभा राहणार आहे. ‘आप’ने सध्या या मतदारसंघात जबरदस्त प्रचार सुरू केला आहे. वीज आंदोलन आणि मोफत रेशन या माध्यमातून ते मतदारसंघात घरोघरी पोहोचले आहेत. 2017 च्या निवडणुकीत ‘आप’च्या उमेदवाराने या मतदारसंघात 4182 मते घेतली होती. बाणावलीचे मागासलेपण आणि वाढती गुन्हेगारी या मुद्द्यावर आप आलेमाव यांना कात्रीत अडकविणार आहेत असे वाटते.

दुभंगलेली काँग्रेस

एकेकाळी बाणावली हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, 2017 च्या निवडणुकीत या पक्षाचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. 2020 साली झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसने पर्यावरणाचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या रॉयला फर्नांडिस यांना निवडणुकीत उभे केले, तरी त्यांना ही निवडणूक जिंकता आली नव्हती. यावेळीही मिकी पाशेको यांनी काँग्रेस उमेदवारीवर आपला दावा सांगितला असला तरी रॉयला फर्नांडिस आणि माजी आमदार कायतान सिल्वा हे अन्य दोन उमेदवार उमेदवारीच्या शर्यतीत असल्याने उमेदवार निवडणे ही काँग्रेससाठी डोकेदुखी बनू शकते. त्याशिवाय आता तृणमूल काँग्रेस रिंगणात उतरल्याने काँग्रेसला या निवडणुकीत निश्चितच मतविभागणीचा फटका बसणार आहे.

युती झाली तर..!

काँग्रेस पक्षाकडेही या मतदारसंघात चांगल्यापैकी मते आहेत. २००२ मध्ये चर्चिल आलेमाव यांना प्रथमच पराभवाची चव चाखायला लावलेले मिकी पाशेको यांनी यावेळी पुन्हा आपण बाणावलीतून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार असे जाहीर केले आहे. मात्र यदाकदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष यांच्यात युती झाल्यास राष्ट्रवादीचे आमदार म्हणून आलेमाव यांनाच ही जागा जाणार आहे. त्यामुळे मिकींना हात चोळत गप्प बसावे लागणार आहे. अशा परिस्थितीत ते काय भूमिका घेतील त्यावरही या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॅटरीचा राजा येतोय! Redmi 15 5G लाँचिंगसाठी सज्ज, 7000mAh बॅटरी करणार कमाल; जाणून घ्या अफलातून फीचर्स

IND vs ENG: भारतासाठी ओव्हल 'लकी' की 'अनलकी'? कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? गिल सेना करणार मोठा चमत्कार

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Lung Cancer: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा तरुणाईला विळखा, 50 वर्षांखालील 21 टक्के लोकांना जखडलं; जाणून घ्या का वाढतोय धोका?

Goa Assembly: गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात वाढ, जून 2025 पर्यंत 54.5 लाख पर्यटकांची नोंद, मंत्री रोहन खंवटेंची माहिती; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT