सहा महिन्याच्या अथक प्रयोगातून आणि वेगवेगळ्या पडताळणीतून ‘सुनापरांत गोवा सेंटर ऑफ आर्ट’चे ‘बाउंडरी’ हे प्रदर्शन आजपासून ‘सुनापरांत’च्या आल्तीनो येथील जागेत सुरू होत आहे.
बाउंडरी- हद्द, आपल्याला इतरांपासून वेगळी करते. ही हद्द खाजगी, सार्वजनिक अशा जीवनाच्या प्रत्येक भागाला लागू असते. अशाच काही हद्दींच्या कडांची, बाह्यरेखांची चाचपणी करत तयार झालेल्या कलाकृतींचे हे प्रदर्शन आहे. फराह मुल्ला, राय आणि सव्यासाची प्रबीर, सन्वयी नाईक, उर्ना सिन्हा, विनिता बार्रेटो यांनी ‘गोवा ओपन आर्टस् कॅटलिस्ट ग्रँट 2021’च्या अंतर्गत केलेल्या संशोधन आणि प्रयोगातून हे प्रदर्शन आकाराला आले आहे. हे प्रदर्शन आपल्याला अनेक स्तरांवरच्या नियंत्रणांचे दर्शन घडवते. ‘ओळख’ संबंधीच्या संकल्पना, आपलेपणा व परकेपणाच्या भावना अशा अनेक स्तरांवरची नियंत्रणे या प्रदर्शनातून स्पष्ट होत जातात. अभेद्य तटबंदी किंवा दृश्य सीमारेखा आपल्याला वेगवेगळ्या पातळ्यांवर इतरांपासून वेगळ्या करतात.
या प्रदर्शनातच ‘गोवा ओपन आर्ट एंगेज ग्रँट’ या प्रकल्पांतर्गत तयार झालेल्या ‘अल्डोना ट्रीऑफ लाइफ’ या म्युरल प्रकल्पाची दृश्ये मांडलेली आपल्याला पाहायला मिळतील. ब्लेज डीसा, कॉन्राड पिंटो, इव्हेनी लुईस, फ्लाविया लोबो यांनी या म्युरलला आकार दिला आहे. हळदोणे गावातल्या विद्यार्थ्यांबरोबर आणि इतर मुलांबरोबर अनेक कार्यशाळांमधून झालेल्या चर्चाविमर्षातून या म्युरलची संकल्पना घडली आहे. आजपासून सुरु होणारे हे प्रदर्शन रोज सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत खुले असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.