‘फेसबुक’च्या मैत्रीला ‘वासने’चं गालबोट!
‘फेसबुक’च्या मैत्रीला ‘वासने’चं गालबोट! Dainik Gomantak
ब्लॉग

‘फेसबुक’च्या मैत्रीला ‘वासने’चं गालबोट!

दशरथ मोरजकर

पर्ये: सत्तरीतील (Satari) नुकत्याच एका माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape Case) झाल्याची घटना समोर आल्यावर मोबाईलचा (Mobile) दुष्परिणाम पुन्हा एकदा समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका तिशीतील विवाहित पुरुषाने विद्यालयात शिकणाऱ्या एका 14 वर्षीय मुलीबरोबर फेसबुकवरून (Facebook) मैत्री केली. मैत्रीचे रूपांतर खोट्यानाट्या प्रेमात केले. प्रेमाच्या जाळ्यात तिला गुंतवून तिला आपल्या घरी घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी त्या संशयिताला बाल हक्क कायद्यांतर्गत अटक केली असून तो सध्‍या पोलिस रिमांडवर आहे. (Girls insecure due to unknown Facebook friend request)

वर वर हे प्रकरण प्रेमाचे दिसत असले, तरी त्यात पुरुषांच्या मनात ‘वासना’ ही भावना गुंतलेली आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवून आपली हौस भागवायची, अशा प्रकारच्या वासनेची मानसिकता काही पुरुषांमध्ये असते. सत्तरीतील ही घटना याच मानसिकतेतून पुढे आली आहे.

सतर्कता हवीच

शिक्षणासाठी दिलेल्या मोबाईलचा दुरुपयोग केल्याचे अनेक प्रकार यापूर्वीही आढळून आले आहेत. सर्वसाधारणपणे फेसबुक अकाऊंटसाठी 18 वर्षांची वयोमर्यादा असली, तरी हा नियम धाब्यावर बसवून फेसबुकवर अनेकजण सक्रिय असतात. या प्रकरणातील अनेक मुलींनीही फेसबुक अकाऊंट केल्याचे समोर आले आहे.

सतर्क राहा, सावध राहा : माधवी पाटील - राणे यांचे आवाहन

  1. कुमारवयीन मुलांमधील तीन प्रकारच्या प्रेमाच्या भावना असतात. आकर्षण (infatuation), प्रेम (Love) व वासना (lust) अशा या तीन भावना आहेत. यापैकी आकर्षण हे कुमारवयीन मुला-मुलींमध्ये सर्रासपणे दिसून येते. एखाद्या मुलाला किंवा मुलीला अचानकपणे एखादी मुलगी किंवा मुलगा आवडायला लागणे, त्याची तीव्रता वाढणे आणि अचानकपणे एकाच्या मनातून ती निघून जाणे, असे घडते. यात जो गुंतलेला राहतो, त्याला त्याचा मानसिक त्रास होतो. पण, नंतर सहा महिने सांभाळले पाहिजे. कुमारवयीन मुले या आकर्षणाला प्रेम समजून बसतात आणि काहीवेळा फसतात.

  2. यातील दुसरी एक भावना म्हणजे प्रेम आहे. प्रेम हे कुणावरही असू शकते. जसे की आई - वडील, भाऊ - बहीण, मित्र, गाव, देश असे आपण कुणावरही प्रेम करू शकतो.

  3. या प्रकारात ‘वासने’ची जी तिसरी भावना खूप धोकादायक आहे. या प्रकारात एखाद्याकडून (युवक/पुरुष) केवळ शारीरिक संभोगासाठी एखाद्या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवतो, आणि तिच्याशी शारीरिक जवळीक साधून आपली हौस भागवून घेतो व कालांतराने मुलीला सोडून देतो. असे प्रकार आता घडताना दिसतात. खरं तर आजच्या मुलींनी अशा प्रकाराला बळी पडू नये, असे आवाहन माधवी पाटील - राणे यांनी केले.

सावधगिरीसाठी मुलींना काही टिप्‍स

  • मुलींनी सोशल मीडिया जसे फेसबुक, इन्‍स्‍टाग्रामवर आलेल्या अनोळखी व्यक्तीचे मैत्रीचे संदेश स्वीकारू नये.

  • जर अशी मैत्री स्वीकारली, तर त्या मुला/ व्यक्तीबद्दल सविस्तरपणे माहिती मिळवावी.

  • जर त्या मित्रासमवेत खासगी चॅटिंग करताना त्यात गुंतू नये व त्यात फसू नये.

  • जर त्या मित्राने बाहेर भेटण्यासाठी बोलावले, तर भेटायला एकटीने जाऊ नये.

  • जर त्या भेटीवेळी त्यांनी शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्याला स्पष्टपणे नकार द्यावा.

  • जर प्रेमाच्या जाळ्यात एखाद्या मुलीला ब्लॅकमेल करीत असेल, तर त्यांनी आपली घरातील व्यक्ती, शिक्षक, मित्र, समुपदेशक किंवा पोलिसांची न संकोचता मदत घ्यावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pallavi Dempo: पल्लवी धेंपे म्हणतात... मला गरिबांच्या समस्या कळतात!

Mysterious Artefact Found In Goa: पणजीत आढळलेल्‍या मूर्तीवर करणार कार्बन प्रक्रिया : नीलेश फळदेसाई

High Tide Alert For Panaji: पणजीसाठी 22 दिवस धोक्याचे; पावसाळ्यात उसळणार 4.5 मीटरपेक्षा अधिक उंच लाटा

Vishwajit Rane On Congress: काँग्रेसने काय दिवे लावले? विश्वजीत राणेंचा घणाघात

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

SCROLL FOR NEXT