Chhatrotsav 2026: छत्रोत्सवात भाविक गुलालमय, श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणच्या दर्शनसाठी मोठी गर्दी Video

Fatorpa shantadurga kunkallikarin chhatrotsav: राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानाचा छत्रोत्सव रविवारी मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा करण्यात आला.
Fatorpa shantadurga kunkallikarin chhatrotsav
Fatorpa shantadurga kunkallikarin chhatrotsavDainik Gomantak
Published on
Updated on

कुंकळ्ळी: राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानाचा छत्रोत्सव रविवारी मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी देवीला गुलाल अर्पण करण्याबरोबरच एकमेकांना गुलाल लावून आनंद व्यक्त केला.

मूळ कुंकळ्ळी येथील असलेल्या श्री शांतादुर्गेची मूर्ती फातर्पा येथे स्थापन करण्यात आली आहे. ही देवी वर्षातून एकदा आपल्या मूळ ठिकाणी कुंकळ्ळी येथे येते. त्या निमित्ताने छत्रोत्सवाची परंपरा पाळली जाते. दुपारी १ वाजता पालखीवर तसेच बारा वांगड्यांच्या बारा फुलांनी सजवलेल्या छत्र्यांवर मंदिराच्या प्रांगणात गुलाल उधळण्यात आला.

त्यानंतर तुतारी आणि ढोलताशांच्या गजरात श्रींची पालखी १२ छत्र्यांसह गोविंद घाटीमार्गे कुंकळ्ळीकडे प्रस्थान झाली. यानंतर मल्लांगिणी, गोठण, पिंपळापेड, भिंवसा आदी ठिकाणी भाविकांना दर्शन दिल्यानंतर कुलवाडा-कुंकळ्ळी येथील मूळ स्थान तळेभाट येथे पालखीचे आगमन झाले.

Fatorpa shantadurga kunkallikarin chhatrotsav
Goa News : शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणचा प्रसिद्ध छत्रोत्सव शनिवारी; हिंदू-ख्रिश्चन एकोप्याचे दर्शन

यावेळी भाविकांच्या अलोट गर्दीत पालखीवर गुलाल उधळण्यात आला. सायंकाळी माड्डीकटा, मार्कूट देमाणी तसेच पायराबांद, कट्टा-बाळ्ळी येथे भाविकांना दर्शन देत सायंकाळी उशिरा पालखीचे पुन्हा मंदिरात आगमन झाले. पारंपरिक विधीनंतर ढोलताशांच्या गजरात धुलपेट झाल्यानंतर उत्सवाची सांगता झाली. दरम्यान, हा उत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थान समितीचे अध्यक्ष विनोद देसाई, सचिव गुणेश देसाई, कोषाध्यक्ष महेंद्र देसाई तसेच मुखत्यार बोंबो देसाई यांनी परिश्रम घेतले.

Fatorpa shantadurga kunkallikarin chhatrotsav
Goa Shigmotsav 2025: धुमधडाक्यात साजरा होणारा गोव्याचा पारंपरिक 'शिगमोत्सव'; उत्सव, परंपरा आणि संस्कृतीचा अनोखा संगम

उत्सवात महिलांची संख्याही अधिक

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानच्या सुप्रसिद्ध छत्रोत्सवात सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गुलाल उधळण्यात आल्याने भाविक रंगून गेले होते. महिलांचाही उत्सवात मोठा सहभाग होता. देवीची खण-नारळाने ओटी भरण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com