'एकोस' कलाप्रदर्शन  Gomantak Digital Team
ब्लॉग

'एकोस' कलाप्रदर्शन 26 मे पासून सुरू

निसर्गात प्रतिध्वनी जसा निनादतो तसाच अनुभव आणि कल्पना आपल्या जीवनात सतत निनादत असतात.

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा ओपन आर्टस्‌ कॅटलिस्ट' आणि 'एंगेज आर्टिस्ट ग्रांट्स 2022-23' यांच्या तिसऱ्या आवृत्तीत सामाविष्ट असलेल्या कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन- 'एकोस', सुनापरान्त गोवा सेंटर फॉर आर्टच्या आल्तिनो येथील कलादालनात शुक्रवार 26 मे रोजी सायंकाळी 6.45 वाजल्यापासून सुरू होत आहे.

निसर्गात प्रतिध्वनी जसा निनादतो तसाच अनुभव आणि कल्पना आपल्या जीवनात सतत निनादत असतात. 'एकोस' या प्रदर्शनात अशाच निनादांचे रुपांतर कलाकृतींमध्ये घडलेले आपल्याला दिसेल. मनश्री पै-दुकळे, प्रतिक नाईक, पुर्वाई अरण्या, सुभाष सज्जा, वेंकटेश पै तसेच हफ्सा बुखारी आणि रश्‍मी बरुआ यांच्या नेतृत्वाखाली 'अनस्कुल गोवा प्रकल्पा'अंतर्गत असलेले युवा कलाकार यांचा या प्रदर्शनात समावेश आहे.

कलाकारांकडून सातत्यपूर्वक केल्या निर्मितीशीलतेला आणि निर्मितीला पाठबळ मिळावे यासाठी 'गोवा ओपन आर्टस'ने 2020 मध्ये 'कॅटॅलिस्ट आणि एंगेज आर्टिस्ट ग्रॅंट'ची योजना केली होती. अनुदान मिळवलेल्या कलाकारांच्या कामाचे प्रदर्शन करण्यासाठी आणि त्यांना लोकांशी संवाद साधता यावा यासाठी गेली तीन वर्षे गोवा ओपन आर्ट्सने 'सुनापरान्त..'बरोबर संयुक्तपणे काम करत आहे.

प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर उपस्थितांना कलाकारांबरोबर कलाकृती पाहता येतील. 7.30 वाजता सुभाष सज्जा, बिंकीत राव आणि आकांक्षा देव यांचा 'ऑसिलेशन ऑर्केस्ट्रा' सादर होईल. हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 या काळात 30 जून 2023 पर्यंत पाहण्यासाठी सर्वांना खुले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: डबल राजयोग! 'या' 5 राशींचे बदलणार भाग्य; हा आठवडा ठरणार खास, कसा ते वाचा..

Vishwanath Dalvi: दळवींचे बंड शमल्यात जमा! पक्षातील एकीला दिले प्राधान्य; दामू नाईक यांनी काढली समजूत

Zomato platform fee hike: खवय्यांच्या खिशाला कात्री! झोमॅटोकडून प्लॅटफॉर्म फीमध्ये मोठी वाढ

VIDEO: 'वेलकम होम संजू सॅमसन'! चेन्नई सुपर किंग्जने शेअर केला खास व्हिडीओ, फॅन्स झाले इमोशनल

IPL 2026: चेन्नईची 'यलो आर्मी' संकटात! एकापाठोपाठ एक 'मॅचविनर' खेळाडू जखमी; 'कमबॅक'ची आशा धुळीस मिळणार?

SCROLL FOR NEXT