goa Dainik Gomantak
ब्लॉग

बॅालिवूिडची 'मेरी पिकफोर्ड' सुधाबाला

दैवयोगाने सुंदर दिसणाऱ्या एरमिलिनला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मूकपटात काम करण्यासाठी त्यावेळी स्त्रिया मिळत नसत. तिचे नाव सुधाबाला ठेवण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

आसावरी कुलकर्णी

गोव्याचा आणि बॉलिवुडचा संबंध काय? गोव्यावर येणारे अतिरंजित सिनेमे? अंधारात हरवलेले दिग्गज संगीत दिगदर्शक, गोव्याहून मुंबईला हेलपाटे घालणारे स्थानिक कलाकार , की इफ्फी? खरंतर हे नातं अगदी मूक चित्रपटांपासून आहे. १९20 ते 30 या काळात काही नायिका या आपला दबदबा गाजवत होत्या.

त्यांच्या मोहक, बिनधास्त अदाकारीमुळे सहपुरुष क्लाकारांपेक्षाही त्यांची चलती होती. यातीलच एक नाव म्हणजे सुधाबाला. गोमंतकातील ऐतिहासिक दिवाडी बेटावर एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या एरमिलिन कार्दोजो हिची कहाणी अगदी बॉलिवूड चित्रपटासारखीच आहे. पावलु आणि मारिया यांच्या घरी जन्मलेल्या एरमिलिनचे बालपण खूप हलाखीचे गेले त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिली.

पुढे परिस्थिती सुधारण्यासाठी आईवडील तिला घेऊन मुंबईत गेले. दैवयोगाने सुंदर दिसणाऱ्या एरमिलिनला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मूकपटात काम करण्यासाठी त्या वेळी स्त्रिया मिळत नसत. तिचं नाव सुधाबाला ठेवण्यात आलं. भीष्म पितामह हा तिचा पहिला चित्रपट होता.

त्यानंतर अनेक मूकपटातून तिने भूमिका केल्या. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ग्लॅमरस भूमिकेसाठी सुलोचना, आणि सुधाबाला या दोघी प्रसिद्ध होत्या. एवढेच नव्हे तर आता बॉलिवूडमध्ये राज्य करणाऱ्या कपूर घराण्याचे पाहिले नायक पृथ्वीराज कपूर यांना बॉलिवूडमध्ये आणणारी सुधाबाला होती.

ऐनवेळी चित्रपटाचा नायक न आल्यामुळे दिगदर्शकाने गर्दीतून एका नटाची निवड करायला सांगितली आणि त्यांनी पृथ्वीराज कपूर यांची निवड केली. प्रसिद्ध झाल्यानंतर स्त्रियांना त्याकाळीही दुय्यम मानलं जायचं. मागे मी टु ट्रेंड खूप गाजला.

अभिनेत्रींनी आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. पण त्याकाळी आपल्या हॉटेल रूमवर दिग्दर्शक आणि निर्माता आल्याची तक्रार करण्याची हिंमत सुधाबाला यांनी दाखवली. कोर्टातल्या न्यायाधीशानी उलट सुधाबाला यांना गोवनीज असे हिणावून त्यांच्या दर्जाबद्दल वाईट भाषा वापरली आणि त्यांना १00 रुपये दंड केला. मात्र दुसऱ्या न्यायाधीशानी हा निर्णय बदलून त्यांना न्याय दिला.

पुढे बोलपटात मात्र त्यांना काम मिळेनासे झाले कारण त्यांची हिंदी भाषा खूपच खराब होती. प्रसिद्ध चित्रपट पत्रकार गर्ग यांनी त्यांच्या पडत्या काळात वर्तमानपत्रातून मदतीचे आवाहन केले. तर उलट गर्ग यांची नोकरीच सुधाबाला यांनी घालवली.

अत्यंत स्वाभिमानी तडफदार अशा एरमिलीन उर्फ सुधाबाला यांना फिल्म जगत ओळखते पण आपण गोमंतकीय? गोमंतकीय स्त्री कलाकारांना बॉलिवूडचे दरवाजे उघडणाऱ्या एरमिलिन यांचे खरंतर आपण ऋणी असले पाहिजे.

त्यांच्या कार्याची दखल गोमंतकीय लेखक मारिओ काब्राल यांनी लोकेशन गोवा या आपल्या पुस्तकात घेतली आहे. इफ्फीत त्यांच्या नावे एखादे दालन तरी व्हावे एवढी अपेक्षा..…!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT