Goa  Dainik Gomantak
ब्लॉग

गोव्यात पर्यावरण जागृती आणि कला आविष्कार

शहरी विस्ताराच्या नावाखाली खाजन जमिनी आणि खारफुटींचा विध्वंस करून गोव्याच्या (Goa) पर्यावरणीय व्यवस्थेला धोका निर्माण होत आहे.

दैनिक गोमन्तक

शहरी विस्ताराच्या नावाखाली खाजन जमिनी आणि खारफुटींचा विध्वंस करून गोव्याच्या (Goa) पर्यावरणीय व्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या बेफिकीर आणि बेजबाबदार विनाशवृत्तीला ‘मॅनग्रुव्ह (एन) सर्कलिंग द लॉस’ ही कलाकारांची संघटना प्रश्न करते. अशा प्रकारचा अयोजनाबद्ध आणि विस्कळीत विकास, हवामान बदलामुळे येऊ घातलेल्या पुराच्या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर, कायम असुरक्षिततेच्या कडेवर उभा असेल.

या संघटनेने पणजी-बांबोळी हमरस्त्याच्या कडेला असणाऱ्या विस्तीर्ण मृत खारफुटीच्या जागेवर एकत्र येऊन कलाकार, पर्यावरणप्रेमी आणि जागरूक नागरिकांसह यापूर्वी तेथल्या खारफुटीच्या विनाशाप्रति आपली संवेदना प्रकट केली आहे. तिथल्या विनाशाकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा तो अभिनव मार्ग होता. काही प्रमाणात हे उद्दिष्ट खचितच साध्य झाले आहे.

‘मॅनग्रुव्ह (एन) सर्कलिंग द लॉस’ यावेळी सांगोल्डा येथील ‘सराया आर्ट कॅफे’मध्ये पर्यावरणाप्रती असलेल्या आपल्या संवेदनाचे प्रतिबिंब चित्रपट, संवाद, चर्चा आणि इतर प्रदर्शनाद्वारे मांडते आहे. शुक्रवार 8 एप्रिल2022 रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळात या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. प्रदर्शन त्यानंतर 23 एप्रिलपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

SCROLL FOR NEXT