World Health Day 2022: आरोग्याबद्दल जागरूक असणे गरजेचे

कोरोना महामारीने आरोग्याबद्दल काळजी घेणे किती गरजेचे आहे हे आपणा सर्वांना दाखवून दिले आहे
World Health Day 2022 News
World Health Day 2022 NewsDainik Gomantak
Published on
Updated on

जागतिक आरोग्य संघटनेद्वारे 1948 सालापासून जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. दरवर्षी एक नवी संकल्पना संघटना राबवत असते. यंदा ‘अवर प्लॅनेट अवर हेल्थ’ (आपला ग्रह आपले आरोग्य) ही संकल्पना संघटनेतर्फे राबविण्यात आली आहे. कोरोना महामारीने आरोग्याबद्दल काळजी घेणे किती गरजेचे आहे हे आपणा सर्वांना दाखवून दिले आहे. त्यामुळे प्रत्येकाला जर चांगले आरोग्य (Health) हवे असेल तर त्यासाठी आपल्या पर्यावरणाचे आरोग्य चांगले ठेवणे गरजेचे आहे. हवा प्रदूषण, जल प्रदूषण, सदोदित बदलणारे तापमान आदी कारणांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे आपल्या पर्यावरणाचे जतन म्हणजेच आपल्या आरोग्याची काळजी घेणे होय. (World Health Day 2022 News)

बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर होतोय परिणाम :

काही वर्षापूर्वी कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब हे आजार फार दूरचे असल्यासारखे वाटत होते, मात्र बदलणाऱ्या जीवनशैलीत आरोग्याची योग्य ती काळजी न घेतल्याने, पुरेशी झोप न घेतल्याने, मानसिक ताण, आहारातील बदल, यासारख्या कारणांमुळे आज लहान वयातच अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. हवामान बदलांमुळे त्वचेच्या (Skin) कर्करोगाचे प्रमाणही वाढले आहे.

विमा असणे गरजेचे  :

आज कोणत्या क्षणी कुणाला काय होईल हे सांगता येत नाही. औषधांचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. सर्वसामान्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जो खर्च येतो तो परवडणारा नसतो. अशावेळी प्रत्येकाने आपला विमा करणे महत्त्वाचे ठरते. शासनाच्या ‘दीनदयाळ स्वास्थ सेवा योजना’ तसेच इतर विम्याच्या सुविधा आहेत.

World Health Day 2022 News
Good Habits: लहान मुलांना लावा सकस आहार घेण्याची सवय

महामारीशी झुंजण्यासाठी सज्ज रहा :

कोरोना महामारीने साऱ्या विश्‍वाला आरोग्याचे महत्त्व समजावून दिले. येणाऱ्या काळात कोरोना महामारीची लाट कशी येईल हे सांगता येणार नाही, मात्र सर्वांनी जागरूक राहणे व आपल्या आरोग्याची काळजी घेणे व आपल्याला निरोगी कसे बनता येईल यावर लक्ष देणे गरजेचे आहे. 

‘आपल्याला जर भविष्यात आरोग्यमय जीवन जगायचे असेल तर आपण आपल्या पर्यावरणाचे आरोग्य सांभाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर आपले पर्यावरण स्वस्थ आणि स्वच्छ असेल तर आपण निरोगी जीवन जगू शकू. आपल्या पर्यावरणाच्या आरोग्याची जर आम्ही आत्ताच काळजी घेतली नाही तर भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.’ 

- डॉ. वर्धन भोबे, लेप्रोस्कॉपी सर्जन

‘आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असणे व आरोग्याचे महत्त्व माहीत असणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. आजकाल सर्वच नागरिक आरोग्याबद्दल जागरूक आहेत मात्र काहींना त्याचे महत्त्व समजलेले नाही. आपल्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. 

- डॉ. नम्रता रायकर, स्त्रीरोगतज्ज्ञ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com