Manohar Parrikar  Dainik Gomantak
ब्लॉग

दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची राजकीय कारकिर्द तशी संघर्षाचीच..!

कै. पर्रीकर यांनी मागे ठेवलेला वारसा खूप मोठा आहे, त्या वारशाचे जतन करणे, त्यांची शिस्तबद्द परंपरा पुढे नेणे अत्यावश्यक आहे.

सुहासिनी प्रभुगावकर

राजधानी पणजीचा आणि भाजपचा, राज्याचा बुलंद आवाज म्हणून ओळख कायम राहीलेल्या दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांची राजकीय कारकिर्द तशी संघर्षाचीच. भाजपला गोव्यात (Goa) शून्यातून सत्तेपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी पक्ष संघटनेच्या बांधणीतही त्यांनी हातभार लावला. भाजपकडे (BJP) सत्ता नव्हती, सरकार डळमळीत झाले त्यावेळी कार्यकर्त्यांत उत्साह कायम असावा यासाठीही ते झटले. त्यांना भाजप नेते लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar), दत्ता खोलकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांना साथ दिली.

प्रथमच राज्यात भाजप सत्तास्थानी आल्यानंतर ज्या योजना राबवल्या त्या योजनांच्या अंमलबजावणीत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचाही सहभाग होता, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर्रीकर यांच्या मागे राहीला, प्रामुख्याने संघनेते सुभाष वेलिंगकर, रत्नाकर लेले यांचा त्यांत प्रामुख्याने समावेश होता. पर्रीकर संघाच्या मुल्यांना चिकटून राहीले नसले तरी त्या मुल्यांचा त्यांनी अनादर केला नाही हेही महत्त्वाचे. समन्वयाच्या राजकारणातून पर्रीकर यांनी पेडणे ते सत्तरी, काणकोणपर्यंत भाजप रुजवण्याचे प्रयत्न केले, मिशन सालसेतही झाले, त्यांत वैयक्तिक स्वार्थाऐवजी पक्षनिष्ठा अधिक होती.

बदलत्या राजकारणात पर्रीकर यांचा शंभर टक्के वारसा पुढे नेणे अपेक्षित नसले तरी मूळ मुल्यें हरवता कामा नयेत. प्रदेश भाजप आज काँग्रेस पक्ष होत नाही ना अशी शंका घेण्यासारखे वातावरण आज तयार होऊ लागले आहे, तेथेच निष्ठावान भाजप कार्यकर्ता बाजूला पडणार नाही ना ? निष्ठावानाचा आवाजच संपणार नाही ना? पक्षाबाहेरून आलेल्यांना घेऊन झालेली पक्षबांधणी कायमस्वरुपी आहे का? या प्रश्नांची उत्तरे आज कै. पर्रीकर यांच्या वाढदिनी शोधून काढावी लागतील अन्यथा ज्या वेगाने भाजपा वाढला त्यावेगानेच तो तळाला जाणार नाही ना? अशी भीती वाटते.

तडजोडी कराव्याच लागतात पण त्या किती करायच्या? आधी म. गो. (MGP) पक्षाच्या खांद्यावरून डोकावून विधानसभेत प्रवेशाची नांदी करणे ठीक होते परंतु ज्या काँग्रेस पक्षावर सातत्याने वार केले त्याच पक्षातील नेत्यांची खोगीरभरती करणे भाजपच्या मुळावर येणार नाही ना? कोणते निकष लावून ही भरती केली जाते? कै. पर्रीकर यांनीही

आघाडी, युतीचे राजकारण केले पण तेथेही त्यांचे खंबीर नेतृत्व कामाला आले, सर्वसंमतीतून राजकारण पुढे नेण्याची ताकद त्यांच्यात होती म्हणून त्यांचे पणजीवर दीर्घकाल वर्चस्व राहीले, सत्तेतही भाजपचे अस्तित्व टिकले. पक्षांतर्गत कलह शमविण्यासाठी त्यांनी आटापिटा केला. आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्यांशी जुळले नाही तेव्हा विधानसभा विसर्जन करण्याचे धाडस त्यांनी दाखवले, तेथे पक्षाचा फायदाच झाला. कै. पर्रीकर यांनी केलेल्या मुत्सद्देगिरीच्या राजकारणातून कायदेही जन्माला आले परंतु त्या कायद्यांची अंमलबजावणीही आज रखडली आहे. महिला व बाल कल्याण, समाजकल्याण, आदिवासी विकास, शिक्षण विकासासाठी त्यांनी राबवलेल्या योजना दीर्घकाल टिकणाऱ्या आहेत, इतर राजकीय पक्षांनाही त्या आदर्श ठरत आहेत परंतु निधीअभावी सरकार दरबारीच त्यांची अंमलबजावणी रखडत आहे.

कै. पर्रीकर यांनी कांही अधिकाऱ्यांनी घडवले, आज ते अधिकारी उच्चपदस्थ झाले आहेत. मागील दोन वर्षांत सरकारने त्या अधिकाऱ्यांचा योग्य उपयोग करून घेतला असता तर आर्थिक आघाडीवरही गोवा झेप घेताना दिसला असता. केंद्र सरकारच्या बऱ्याच योजना राज्य सरकारला उपयुक्त ठरणाऱ्या आहेत, त्यांची घोषणाही होते परंतु त्यांचा पाठपुरावा केला जातो का? सक्षम प्रशासन राज्याकडे आहे का?

खाणी बंद झाल्या तरी राज्याचे राज्याचे अर्थकारण सावरण्यासाठी कामकाज करण्यात कै. पर्रीकर यांनी कुचराई केली नाही. कालबद्द सरकारी सेवा देण्यासाठी जन्माला घातलेल्या कायद्याची देणगीही त्यांचीच. त्याचा फायदा तोटा किती होत आहे याचे मोजमाप होतेय का? विश्वासार्हतेच्या बळावर कै. पर्रीकर यांनी विरोधकांनाही आपलेसे केले, विचारविनिमयातून गोवा बालक हक्क कायदा साकार केला, पर्वरीतील सचिवालय, मंत्रालयही उभारले, गोवा सायन्स सेंटरही त्यांच्याच काळातले.

कै. पर्रीकर यांनी मागे ठेवलेला वारसा खूप मोठा आहे, त्या वारशाचे जतन करणे, त्यांची शिस्तबद्द परंपरा पुढे नेणे अत्यावश्यक आहे. जिद्द, राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर कै. पर्रीकर यांनी आपल्या सेवेचा लाभ देशालाही मिळवून दिला आहे. नकारात्मकतेला हळुवारपणे दूर करून समाजात पक्षासाठी पूरक सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची क्षमता कै. पर्रीकर यांच्यात होती. इतरांकडून चांगले काय आहे ते स्वीकारण्यास माजी मुख्यमंत्री अनमनले नाहीत.

मतदारसंघाकडे पलीकडे जात, वास्तव समजून घेत त्यांनी राज्याचे हीत पाहिले, देशहीतही जपले. भाजपला बुलंद आवाज येत्या निवडणुकीतून पुन्हा मिळेल का? मनोहारी वारशाची परंपरा जपणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT