Goa Culture : गोव्यात एक बरं बुवा. कुणालाही दोतोर म्हणतात. औषधं देणाऱ्या वैद्याला दोतोर म्हणतात ते ठीक. गुरांच्या वैद्याला दोतोर म्हणतात तेही ठीक. पोर्तुगीज (Portuguese) प्रभावामुळे वकिलांना न्यायाधीशांना दोतोर म्हणण्याचा प्रघात गोव्यात आहे. विद्वानाला, पंडिताला सुध्दा दोतोर म्हणतात. पीएच डी केलेल्यालाही दोतोर एक नामांकित डॉक्टर होता. त्याच्याकडे एक रुग्ण आला. त्यानं आपली तक्रार केली आणि लक्षणं सांगितली. डॉक्टर, माझा हा हाताचा अंगठा डोक्याला लावला तर डोकं दुखायला लागतं. कपाळाला लावला तर कपाळ ठणकतं. गुडघ्यावर ठेवला तर गुडघ्याला वेदना होते. डॉक्टर (Doctor) शांत होते. त्यांनी त्याचा अंगठा हातात घेतला आणि जोरात दाबला. पेशंटने (Patients) किंकाळी फोडली. दुखतो दुखतो म्हणत विव्हळला. डॉक्टरने सांगितलं, बाळा, तुझ्या शरीराच्या कुठल्याही अवयवाला कसलीही समस्या नाही. फक्त तुझ्या या अंगठ्याला फ्रॅक्चर आहे. हा फक्त विनोद नाही. यात बोध भरलेला आहे. घेणाऱ्यासाठी. आमच्यात अनेकदा स्थिरतेची, शांतीची, प्रेमाच्या ओलाव्याची पोकळी, कमी असते. ती भरून काढण्यासाठी आम्ही दोष दुसऱ्यांवर ठेवतो अथवा परिस्थितीवर ठपका ठेवतो.
ही बोधकथा माझ्याच एका ओळखीच्या डॉक्टरने मला सांगितली होती. या डॉक्टरला साहित्याची खूप आवड आहे. वाचतो खूप. एकदा मी त्याच्या ओपीडीत गेलो होतो. 'जरा थांब, दोन पेशंट झाल्यानंतर चहा घ्यायला जाऊ', त्यानं म्हटलं.
पेशंटपैकी एक बाई होती. हिंदी बोलणारी. तिला औषध लिहून दिलं डॉक्टरने. तरीही मी जरा वजन चेक करते हं, असं म्हणत ती वजन यंत्रावर जाऊन उभी राहिली. तिनं आपलं वजन बघितलं, एक मिनिट म्हणत पर्स काढून बाजूला ठेवली, परत वजन मशीनवर उभी. झालं झालं म्हणत, तिनं हाताचे घड्याळ, सुवर्ण अलंकार काढून पर्समध्ये ठेवले. परत वजन मशीनवर गेली. माझं तोंड बघून डॉक्टर मित्र म्हणतो कसा, 'अरवळ रे. मालूक.' तिला कोंकणी कळत नव्हती. पण हसू कसं दाबावं हेच मला कळलं नाही. गोव्यात एक बरं बुवा. कुणालाही दोतोर म्हणतात. औषधं देणाऱ्या वैद्याला दोतोर म्हणतात ते ठीक. गुरांच्या वैद्याला दोतोर म्हणतात तेही ठीक. पोर्तुगीज प्रभावामुळे वकिलांना न्यायाधीशांना दोतोर म्हणण्याचा प्रघात गोव्यात आहे. विद्वानाला पंडिताला सुध्दा दोतोर म्हणतात. पीएच डी केलेल्यालाही दोतोर!
माझ्या लहानपणी मेदिक सुर्रजांव ही पोर्तुगीज पदवी होती डॉक्टरना. माझी आजी फार आजारी होती, म्हणून एका डॉक्टरला आणलं. तिला इंजेंसांव देणं भाग आहे असं त्यांनी सांगितलं. इंट्रा-व्हेनस. शिरेचं इंजेक्शन. डॉक्टरनी सुरू केलं. सिरींज खुपसलं. काय झालं कुणास ठाऊक. अकस्मात त्यानी ते बाहेर काढलं असावं...घाबरून. रक्ताची एक धार उसळली. ती थेट डॉक्टरच्या कोटावर. लाल लाल. आम्ही हा प्रसंग आ वासून बघत होतो. विसरूच शकत नाही.
आमच्या ओळखीचा एक हुशार डॉक्टर एका गावात प्रॅक्टीस करत होता. आहे. तो एकदा आजारी पडला. किंचित हृदयरोगाचं निदान झाल्यानं त्याला दोन आठवडे आराम घ्यायला सांगितलं होतं. तरीही गांवभर रुग्णप्रिय असल्याने अधूनमधून लोक वासपूस करायला जायचेच. तो डॉक्टर आहे हे विसरून त्यालाच अनाहूत सल्ला द्यायचे. काही लोक ग्रामीण झाडपाल्याची औषधेही घेऊन जायचे. डॉक्टरची पंचाईत झाली होती, ते अनाहूत सल्ले ऐकून. बिचाऱ्यानं सहन केलं.
माझी मावशी मुंबईहून गोव्यात आली होती. वयस्कर. आरोग्य थोडं बिघडलं म्हणून ती डॉक्टरकडे गेली. तपासणी वगैरे झाली. क्रॉस चेक करायला डॉक्टरनी जाडजूड पुस्तक उघडलं आणि थोडं वाचून घेऊन नंतर औषधं दिली. ही उगाच घाबरली. निदान झालं आहे की नाही या संभ्रमात राहिली. शेवटी बरी झाली. सुटकेचा निश्वास सोडला, तिनं आणि आम्हीही.
हल्ली आणखीन एक समस्या उद्भवली आहे. काहीही औषधं द्या, युवा मंडळी तात्काळ स्मार्टफोनवर जाऊन तिथं चाचपणी करतात. डॉक्टरनी सल्ला दिला ते पथ्य निमूटपणे न पाळता, न जुमानता इंटरनेटवर क्रॉस चेक करतात, याचा डॉक्टरांना फार त्रास होतो. रोग, औषधं याविषयी सगळं सगळं तिथंच वाचन करतात. स्वत:ला आणखीन गोंधळून घेतात.
कोकणीत 'भयरोजोळोप' म्हणून शब्द आहे. अनेक रुग्ण असे असतात, त्यांची समस्या मानसिक असते. त्याना उगाच मला हा आजार झालाय, ते दुखणं झालं असं वाटत असतं. कायम डॉक्टरचे उंबरठे झिजवणं, रक्ततपासण्या, स्ट्रेस टेस्ट, एमआयआर वगैरे वगैरे करत असतात. दाट फाईल घेऊन फिरणं, डोकेदुखीविषयी बोलून दुसऱ्यांना डोकेदुखी करणं हा त्यांचा दिनक्रम. वारंवार येणारे यांचे फोन घेऊन डॉक्टरही नंतर असल्या पेशंटना कंटाळतात.
लहानपणी घरात दोतोर वा भावोजी येणं म्हणजे मोठा आदरातिथ्याचा थाट होता. डॉक्टरांचं एक चौकोनी चामड्याचं बॅग असायचं. तपासणी झाल्यानंतर 'दोतोराक शाबू दी रे,' 'आरे, नॅपकीन दी', असा कडक आदेश आम्हांला मिळायचा. दोतोर, दोतोर... अदबीचा आदर पाहून मला डॉक्टर व्हावं असं एक क्षण वाटायचं, नंतर डॉक्टर गेल्यावर ते स्वप्न रेतीत पडणाऱ्या पाण्यासारखं जिरायचं. कारण, मला रक्ताची भीती वाटते. बघवत नाही ते. इथं चार्ली चॅप्लीनच्या एका वाक्याची आवर्जून आठवण होते – मला नाही रक्त पाहवत. काय करू? माझ्या शरीरभर तेच तर अभिसरण होत आहे!!
मुकेश थळी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.