Restaurant Dainik Gomantak
ब्लॉग

Restaurant: सी पेबल्स सिर्फ नाम ही काफी

गोमन्तक डिजिटल टीम

मनस्विनी प्रभुणे नायक

मोर अथांग निळाशार समुद्र आहे. समुद्राच्या लाटांची गाज ऐकू येतेय. या पार्श्वभूमीवर मंद वाजणारे संगीत आणि त्यासोबत आवडणारे चविष्ट खाद्यपदार्थ अशी ही सगळी सुंदरशी संगती जुळून येणारी रेस्टोरंट पणजीत तशी कमीच. पणजी टाळून उत्तर गोव्यातील कोणत्याही समुद्र किनाऱ्यावर जेवायला जावे तर या किनाऱ्यावरील शॅक्समध्ये जाण्यात अजिबात रस वाटत नाही.

कानठळ्या बसेल असे जोरजोरात वाजणारे संगीत जे आपापसात बोलण्याची संधीसुद्धा देत नाही अशा शॅक्समध्ये कितीही सुग्रास जेवण मिळत असले तरी तिथे पाय ठेवणे नको वाटते. मांडवी नदीच्या किनाऱ्यावर फार मोजकी रेस्टोरंट्स होती पण यातली बरीचशी सध्या बंद पडली आहेत.

मुख्य रस्त्यावरील रहदारी बघून या रेस्टॉरंटमध्येही जेवायला जाणे नको वाटते. पण दोना पावलाला ‘सी पेबल्स’ परत सुरू झाले आणि पणजीतली ही कमतरता भरून निघाली.

दोना पावलाला परत ‘सी पेबल्स’ सुरू झालेय हे ऐकिवात होते, पण बाहेर जेवायला जायची वेळ आली की नेमका ‘सी पेबल्स’चा विसर पडायचा. काही दिवसांपूर्वी माझ्या बालपणीच्या मैत्रिणी आल्या होत्या. त्यांना कुठल्यातरी वेगळ्या ठिकाणी जेवायला घेऊन जायचे डोक्यात असताना एकदम ‘सी पेबल्स’ची आठवण आली.

दोनापावलाचा उतार संपताच उजव्या हाताला बंगला दिसतो, त्या बंगल्याला लागून थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर मागच्या बाजूला समुद्राच्या दिशेला ‘सी पेबल्स’ आहे. या भागात असे सुंदर रेस्टोरंट आहे हे दोनपावलाच्या रस्त्यावरून जाताना समजत नाही.

जरा रस्त्याच्या मागच्या बाजूला असल्यामुळे अंदाज येत नाही. पण इथे सूर्यास्ताला जाणे हाच मुळात अतिशय सुंदर अनुभव आहे. सूर्यास्तावेळी जाऊन समुद्राच्या दिशेची जागा पटकवायची. या जागेसाठीच तर सारी धडपड असते.

मग आरामात एका पाठोपाठ एक पदार्थ ऑर्डर करायचे. अस्ताला जाऊ लागलेला सूर्य आणि त्यानंतरचा आकाशात पसरलेला ‘संधिप्रकाश’ इथल्या वातावरणात अधिक रंग भरतात.

इथे फक्त दक्षिण भारतीय पदार्थ सोडून सगळ्या प्रकारचे पदार्थ मिळतात. गोमंतकीय, उत्तर भारतीय, मुगलाई, चायनीज यात बरेच पर्याय तुम्हांला मिळतील. कबाबच्या शौकिनांना हे रेस्टोरंट आवडेल कारण इथे अतिशय चविष्ट कबाब मिळतात.

लाहोरी मुर्ग, अमृतसरी चिकन, आलिशान चिकन असे वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यात बनवलेले कबाब खाण्यासाठी खवय्ये इथे मुद्दाम येतात. यात तंदुरी प्रॉन्स आणि दक्षिणी प्रॉन्स मुद्दाम खाऊन बघा. गोमंतकीय पदार्थांमध्ये सगळेच पदार्थ अतिशय चविष्ट आहेत. प्रॉन्स रवा फ्राय, रेषाद बांगडा हे आपण नेहमीच खातो पण इथे प्रॉन्स काफ्रिआल, किंग फिश काफ्रिआल खाऊन बघा.

‘टेंडर कोकोनट चिली फ्राय’ला सर्वांत जास्त मागणी टेंडर कोकोनट चिली फ्राय हा पदार्थ इथला सर्वांत जास्त पसंत केला जाणारा पदार्थ. नाव ऐकूनच या पदार्थाबद्दल उत्सुकता वाढली. टेंडर कोकोनट आइस्क्रीम खाल्ले होते पण टेंडर कोकोनट चिली फ्राय हे पहिल्यांदाच ऐकले.

कोवळ्या नारळाचा मऊसूतपणा आणि मिरचीचा हलकासा तिखटपणा यांची एकत्रित चव फार छान लागते. टेंडर कोकोनटचा असा पदार्थ मी अन्य कुठल्याच रेस्टोरंटमध्ये खाल्ला नव्हता. ‘स्टार्टर’ म्हणून अनेकजण ‘टेंडर कोकोनट चिली फ्राय’ मागवतात.

एवढी सगळी चविष्ट विविधता असलेल्या मेन्यूमध्ये इथली बिर्याणी आणि पुलावाचे प्रकार आपले लक्ष वेधून घेतात. चिकन, प्रॉन्स, मटण, अंडा, व्हेज बिर्याणी याबरोबर प्रॉन्स पुलाव, ग्रीन पीस पुलाव, चिकन पुलाव इथे मिळतो.

पण यात भाव खाऊन जातो ‘तिसऱ्यांचो पुलाव’. तिसऱ्यांचो पुलाव सहजासहजी रेस्टोरंटमध्ये मिळत नाही. छान मोकळा शिजलेला बासमती भाताचा सुंदर सुगंध आणि त्यातील प्रत्येक घासासोबत चव वाढवणाऱ्या तिसऱ्या यामुळे हा पुलाव फार आवडला.

सध्या ‘सी पेबल्स’मध्ये फिश थाळी मिळत नाही. पूर्वी ‘सी पेबल्स’ फिश थाळीसाठी प्रसिद्ध होते. आजही अनेकजण दुपारी येऊन ‘फिश थाळी’ बद्दल विचारतात. जुलै महिन्यापासून इथे दुपारी फिश थाळी मिळणार आहे.

‘एका चांगल्या फिश थाळीचा आस्वाद लोकांना घेता यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. फिश थाळीत कोणकोणते पदार्थ असायला हवेत, त्यात वापरले जाणारे मसाले यावर आमचे बारकाईने काम सुरू आहे’ अशी माहिती ‘सी पेबल्स’चे मॅनेजर ज्योडी यांनी पुरवली.

वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळी रेस्टोरंट प्रसिद्ध असतात. असे म्हटले जाते की जिथे आजूबाजूचे वातावरण एवढे चांगले नसते, साधेसुधे असते तिथे हमखास जेवण चांगले मिळते. पण आता असे म्हणण्याचे दिवस गेले.

आता दोन्ही गोष्टींचा ताळमेळ बसवणारी नवी पिढी या व्यवसायात उतरली आहे. ‘सी पेबल्स’बाबत बोलायचे झाले तर इथला विहंगम परिसर, अथांग पसरलेल्या समुद्राचे दृश्य बघूनच आपले सगळे पैसे वसूल होतात. काही खास कारणांसाठी, आपल्या खास व्यक्तीला मुद्दाम इथे घेऊन जा. ‘सी पेबल्स’मध्ये जाणे म्हणजे आपण स्वतःलाच दिलेली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

वेलिंगकरप्रकरणी 'लुकआऊट नोटीस' जारी! हिंदुत्ववादी संघटनांचे समर्थन; पोलिसांची पथके मागावर

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

SCROLL FOR NEXT