Agro tourism in Goa Dainik Gomantak
ब्लॉग

Agro tourism in Goa : डायकॉन कॉयर; गोव्याच्या शाश्‍‍वत पर्यावरणीय विकासाचे बनले प्रतीक

गोमन्तक डिजिटल टीम

Agro tourism in Goa : कोमल खापर्डे, गोव्याची रहिवाशी. गोवा म्हटलं की संदरसुंदर समुद्रकिनारे आणि उंचचउंच नारळांच्या झाडांनी व्यापलेला रमणीय परिसर. गोव्यामध्ये नारळाचे उत्पादन प्रचंड असले तरी ‘कोकोनट वेस्ट’ अर्थात अत्यंत मौल्यवान अशा नारळाच्या साली करवंट्या, भुसा वाया जाण्याचे प्रमाण खूप होते आणि ते पाहून मी नेहमीच व्यथित होत असे.

पुढे गोवा विद्यापीठातून एमबीए पूर्ण केल्यानंतर मी नारळाच्या या मौल्यवान कचऱ्याचा वापर मानव आणि पर्यावरणार्थ उपयुक्त उत्पादनांमध्ये करण्यासाठी पुढाकार घेतला आणि एक उत्पादन युनिट सुरू केले.

सांगायला आनंद वाटतो की, आज आमच्या या उत्पादन युनिटमध्ये २० महिलांना रोजगार लाभला आहे.

आमचे हे अभूतपूर्व उत्पादन युनिट ‘डायकॉन कॉयर’ (DIAKON COIR) हे गोव्यातील मडगावच्या हद्दीवरील एका निवांत परिसरात आहे. या युनिटने कोकोपीट, कॉयर रोप अर्थात काथ्या-दोरी आणि कॉयर पॉट उद्योगात जणू एक क्रांती केली आहे.

‘विकासातील शाश्वतता आणि नवोन्मेषासाठी सखोल वचनबद्धता’ स्वीकारलेले आमचे हे उत्पादन युनिट या प्रदेशातील बदलासाठी खऱ्या अर्थाने एक ‘कॅटॅलिस्ट'' अर्थात ‘उत्प्रेरक’ बनले आहे.

इतकेच नाही तर स्थानिक अर्थव्यवस्थेवर त्याचा एक सखोल प्रभाव पडला असून समाजाला त्यापासून पर्यावरणीय लाभ होत आहेत, असे कोमल खापर्डे म्‍हणाल्‍या.

आमच्या युनिटच्या केंद्रस्थानी कोकोपीटचे उत्पादन आहे. कोकोपीट म्हणजे पारंपरिक मातीला बहुमुखी आणि पर्यावरणास अनुकूल पर्याय होय.

नारळाचा तंतुमय भुसा व सालीपासून निर्मित कोकोपीटमध्ये असाधारण पाणी धारणा क्षमता आणि वायुव्‍हिजन गुणधर्म असल्यामुळे ते जगभरातील गार्डनर्स आणि हॉर्टिकल्चरिस्ट्स यांना आपल्या बागेसाठी हवे असणारे एक उत्कृष्ट माध्यम बनले आहे.

नारळाच्या टाकाऊ भुशाचा उपयुक्त वापर करणारे आमचे युनिट केवळ कचरा कमी करते असे नाही तर माती उत्खननाला एक चांगला पर्याय उपलब्ध करून देऊन जंगलतोड कमी करण्यास मदत करते, असे खापर्डे यांनी सांगितले.

‘कॉयर रोप’ अर्थात नारळाच्या काथ्यापासून निर्मित दोरी आपल्या मजबूतपणा आणि टिकाऊपणासाठी प्रसिद्ध असून तिला गोव्यात एक समृद्ध इतिहास लाभला आहे. तथापि, कमी होत जाणारी मागणी आणि लुप्त होत चाललेली पारंपारिक तंत्रे या जुन्या उद्योगासाठी मोठा धोका निर्माण करणारे ठरले आहे.

असे असले तरी आमच्या उत्पादन युनिटने सांस्कृतिक वारसा जपण्याचे आव्हान स्वीकारले आणि शाश्वत उपजीविका निर्माण करण्याचे महत्त्व ओळखून नवोपक्रमाचा स्वीकार केला आहे.

सातत्यपूर्ण गुणवत्ता, किफायतशीपणा आणि कार्बन फूटप्रिंट कमी करण्याची खात्री देणारे आमचे कॉयर पॉट्स पर्यावरण जागरूक गार्डनर्स आणि रोपवाटिकांसाठी सर्वाधिक पसंतीची निवड ठरले आहेत.

आमच्या उत्पादन युनिटच्या स्थापनेमुळे गोव्याचा नावलौकिक ‘शाश्वत उत्पादनासाठीचे केंद्र’ म्हणून झाला असून मोठ्या संख्येने रोजगार संधी निर्माण होण्यास मदत झाली आहे.

स्थिर रोजगार प्रदान आणि व्यावसायिकता वाढीस प्रोत्साहन देणारे आमचे युनिट समाजाच्या उत्थानासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे ठरले आहे. म्हणूनच आमच्या प्रदेशाच्या आर्थिक कल्याणासाठी आम्ही योगदान देऊ शकलो.

याचा आम्हाला आज खूप अभिमान वाटत आहे, असे खापर्डे यांनी सांगितले. आपल्या प्रिय वसुंधरेला हवामानबदलाच्या संकटाचा गंभीर धोका निर्माण झाला असताना नेमक्या अशावेळी आमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट हिरव्यागार, सुजलाम्‌ सुफलाम्‌ वसुंधरा निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्यरत आहे.

कोकोपीट आणि कॉयर पॉट्ससारख्या पर्यावरणपूरक पर्याय वापराचा सक्रियपणे प्रचार करून आम्ही नॉन-बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट्स अर्थात अ-जैवविघटनशील उत्पादनांची मागणी कमी करण्यास आणि शाश्वत शेतीस प्रोत्साहन देण्यास मदत करत आहोत.

कोकोपीट, कॉयर रोप आणि कॉयर पॉटस्‌ची निर्मिती करणारे आमचे उत्पादन युनिट हे शाश्वत प्रगती आणि नावीन्यपूर्ण निर्मितीचे प्रतीक बनले आहे. आमचे युनिट हे पारंपरिक उद्योगांचे पुनरुज्जीवन करण्यापासून पर्यावरण जागृतीला चालना देण्यापर्यंत आमच्या प्रदेशाच्या विकासाचे एक महत्वपूर्ण साधन बनले आहे.

आमच्या युनिटचा सातत्यपूर्ण विकास आणि विस्तार होत असताना विकासातील शाश्वतता, स्थानिक सशक्तीकरण आणि तांत्रिक प्रगती साधण्यासाठी आमची अतुट वचनबध्दता कायम आहे.

चला, आपण सगळे पुन्हा एकत्र येऊन पर्यावरणीय जागरुकता आणि समृद्ध भविष्य निर्मितीसाठी कटिबद्ध होऊया, असे आवाहन कोमल खापर्डे यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT