Eco Farming in Goa : एनव्ही इकोफार्म हा मुळात कुलागरासारखा पर्यावरणातील एक निसर्गप्रिय कृषी उपक्रम. जेथे अनेक वर्षांपूर्वी शाश्वत शेती केली जात होती.
या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांना विविध कृषी पद्धती, सिंचनाचे प्रकार आणि फिरत्या पिकांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. एखादी व्यक्ती ताजी फळे आणि भाज्या काढू शकते.
पावसाळ्यात येथे खळाळून वाहणारा नैसर्गिक जल प्रवाह, मानवनिर्मित आणि नैसर्गिक धबधबा पाहुण्यांना एक उत्साही अनुभव देतो. आमच्याकडे स्विमिंग पूलही आहे.
बार काउंटरसह खासगी जलतरण तलाव लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तुम्ही या ठिकाणी प्रवेश करताच एक मोठा वटवृक्ष तुमचे स्वागत करतो.
तुम्ही दगडी पायवाटेवरून खाली गेल्यानंतर आमच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचता, जे गोमंतकीय अन्न पदार्थ उपलब्ध असतात. येथे आम्ही पाहुण्यांचे स्वागत करतो. आमच्या पारंपरीक औषधी चहासह गोमंतकीय पाव- भाजीने. बुफेमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकार आहेत.
स्पाइस ट्रेलमध्ये फुलपाखरू पार्क (बंदिस्त नव्हे), नक्षत्र वन आणि वृक्षारोपण पिकांचा समावेश आहे. पाहुण्यांच्या आवडीनुसार आम्ही लागवड केलेल्या वनस्पती आणि त्यांचे उपयोग याबद्दल चांगली माहिती देतो.
आमच्याकडे वॉल क्लाइंबिंग, रॅपलिंग, झिपलाइन, बर्मा ब्रिज कमांडो ब्रिज, माँकिंग ब्रिज, जंपिंग जॅक असे सात साहसी उपक्रम आहेत. या उपक्रमांसाठी आम्ही झाडांचा आधार म्हणून वापर केला आहे. पूर्वी आमच्याकडे सर्व लाकडी संरचना होत्या. पण सुरक्षिततेसाठी आता आम्ही त्या धातूच्या बनविल्या आहेत.
आमच्याकडे रात्रीच्या मुक्कामासाठी चार वातानुकुलीत कुटिरे आहेत. एक लॅटराइटपासून बनवलेले आहे आणि रेस्टॉरंटच्या जवळ आहे. इतर तीन लाकडी कुटिरे ओहोळाच्या बाजूने जलतरण तलावानजीक आहेत.
पूर्वी आम्ही आमचे वडिलोपार्जित घर लोकांच्या मोठ्या गटासाठी भाड्याने देत होतो. पण आता आम्ही एक पॅव्हिलियन बांधला आहे, ज्यामध्ये विवाह समारंभ किंवा वाढदिवसाच्या पार्टीसाठी कॉन्फरन्स रूम आहे.
त्याचा वापर डॉर्मिटरी म्हणूनही केला जाऊ शकतो. चित्रे, स्लाइड शो, चर्चा, कार्यशाळा आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेची माहिती देणारे दालन आमच्याकडे असेल.
निसर्गाने दिलेल्या समृद्ध जैवविविधतेची माहिती मिळवण्यासाठी पदभ्रमण करण्यासाठी पावसाळा सर्वोत्तम काळ आहे. जसजसे तुम्ही मार्गक्रमण करता तसतसे तुम्ही भरपूर प्रमाणात वाटेत उपलब्ध नैसर्गिक भाज्या आणि फळे गोळा करू शकता.
तायकिळो, तेरो, फागला वगैरे इथे मुबलक प्रमाणात उगवतात. आमच्याकडे हळद, आले भरपूर पिकते. प्रत्येक मोसमात पाहुण्यांना देण्यासाठी आमच्याकडे काहीतरी असते.
उन्हाळ्यात आमच्याकडे काजू पीक असते. येथे पाहुण्यांना जमिनीवरून काजू बोंडे उचलण्यासह त्या बोेंडातील काजूबिया पिळून काढणे, काजू बोंडे पायांनी मळून चार दिवस ठेवलेल्या काजूचा रस नैसर्गिकरीत्या आंबवणे हे अनुभवायला मिळते. हुर्राक आणि नंतर फेणी देणारी प्रक्रिया देखील स्पष्ट केली जात असते.
येथे पाहुण्यांना स्वादिष्ट निऱ्याचा आस्वाद घेता येतो. आम्ही पारंपारिक पद्धतीने काजू भाजण्याचे प्रात्यक्षिक दाखवतो आणि पाहुणे बिया फोडून त्यातील गरमागरम काजू खाऊ शकतात. आम्ही आमच्या पाहुण्यांना आमच्या रमणीय जागेत अनोखा आल्हाददायक अनुभव देण्याचा प्रयत्न करतो.
आमच्या स्थानिक लोकांच्या सोबत ग्रामीण पाहुणचाराचा आनंद लुटण्याची संधी देतो. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब मित्रपरिवारासह अशा रम्य ठिकाणी अवश्य भेट द्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.