Swapnil Salkar
Swapnil SalkarDainik Goamtak

Blog : डॉ. स्वप्निल याने लिहिलेला चित्रपट व्हेनिस महोस्तव

वेनिस चित्रपट महोत्सवात त्याने लेखन केलेल्या चित्रपटाला मिळालेले स्थान हे नक्कीच त्याच्या सातत्याला मिळालेले फळ आहे.
Published on

20 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या 80 व्या प्रतिष्ठित वेनिस चित्रपट महोत्सवात भारताच्या ‘स्टोलन’ या चित्रपटाची निवड झाली आहे. त्यात गोव्यासाठी गौरवाची असणारी गोष्ट म्हणजे डॉ. स्वप्नील साळकर यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. ‘खुर्चीला खिळवून ठेवणारा चित्रपट’ असे वर्णन करता येणारा हा चित्रपट महोत्सवाच्या ओरिझोंटी एक्स्ट्रा विभागात दाखवला जाईल.

गोव्यात वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच स्वप्निल याने चित्रपट निर्मिती करण्यास सुरुवात केली होती. त्याचे लघुपट ज्यांनी पाहिले असतील त्यांना त्याच्या विलक्षण प्रतिभेची कल्पना नक्कीच असेल. गेली दहा वर्षे सिनेमाची उत्कट आवड असणाऱ्या स्वप्नीलचे या क्षेत्रातील स्थान ‘स्टोलन’मुळे नक्कीच सिद्ध झाले आहे. डॉ. स्वप्नीलने गेली कित्येक वर्षे आपला पूर्ण वेळ चित्रपट क्षेत्रालाच दिलेला आहे. वेनिस चित्रपट महोत्सवात त्याने लेखन केलेल्या चित्रपटाला मिळालेले स्थान हे नक्कीच त्याच्या सातत्याला मिळालेले फळ आहे.

Swapnil Salkar
Blog : मिश्‍कील नजरेतून गोवा

‘स्टोलन’ हा चित्रपट करण तेजपाल यांनी दिग्दर्शित केला आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट असून. लेखक म्हणून स्वप्निल साळकर यांचाही हा पहिलाच पूर्ण लांबीचा चित्रपट आहे. गेल्या दोन वर्षात व्हेनिस चित्रपट महोत्सवात स्थान मिळवणारा स्टोलन हा एकमेव चित्रपट आहे. जगातल्या सर्वात जुन्या अशा या चित्रपट महोत्सवात यापूर्वी सत्यजित रे, मीरा नायर अशा दिग्गज दिग्दर्शकांचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com