SIP Calculator: गुंतवणुकीला सुरवात करण्यासाठी म्युच्युअल फंड सर्वात चांगल्या पर्यायांपैकी एक मानला जातो. जर तुम्हाला केवळ 4 वर्षात 10 लाख रुपयांहून अधिक पैसे कमवायचे असतील तर एसआयपी कॅल्युलेटर (SIP Calculator) च्या मदतीने ते कसे करता येतील, याची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत.
म्यूचुअल फंड (Mutual Fund) गुंतवणुकीचा एक असा पर्याय आहे ज्याद्वारे दीर्घकाळ गुंतवणुकीतून मोठी रक्कम उभा केली जाऊ शकते. म्युच्युअल फंड्सच्या अशा अनेक योजना आहेत, ज्या गुंतवणुकदारांना दीर्घकाळाच्या कालखंडात वर्षाला 12 ते 15 टक्के वार्षिक परतावा देतात. यात एकरकमी किंवा सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक करता येते.
4 वर्षात 10 लाख रुपयांसाठी असे करा प्लॅनिंग
केवळ चार वर्षात 10 लाख रुपये उभा करण्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये दर महिन्याला 16 हजार 500 रुपये गुंतवावे लागतील. अशा रितीने चार वर्षात तुमची एकुण गुंतवणूक होईल 7 लाख 92 हजार 000 रुपये. त्यावरील व्याजदर धरून ही रक्कम एकुण 10,20,275 रुपये होईल. यात वार्षिक 12 टक्के परतावा गृहित धरला आहे. म्हणजेच तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर 12 टक्के वार्षिक व्याजाने एकुण 2,28,275 रुपये एकुण परतावा तुम्हाला मिळेल.
अर्थात हा अंदाज आहे. शेअर मार्केटमधील चढ उताराचा काही परिणाम म्युच्युअल फंडाच्या कामगिरीवर होऊ शकतो. पण एसआयपी गुंतवणूक हा गुंतवणुकीचा एक सिस्टेमॅटिक मार्ग आहे. एसआयपीमध्ये शेअर मार्केटमधील रिस्कचा थेट परिणाम होत नाही. यात पारंपरिक व्याजदराहुन अधिक व्याज मिळते. त्यामुळेच प्रत्येक गुंतवणुकदाराने आपले उत्पन्न, कशासाठी गुंतवणूक करत आहोत ते लक्ष्य आणि रिस्क प्रोफाईल अभ्यासूनच पैसे गुंतवले पाहिजेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.