Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanDainik Gomantak

Fuel Tax: पेट्रोल अन् डिझेलच्या वाढत्या किमतींदरम्यान अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, ऐकून...

FM On Fuel Tax: सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. तुम्हीही पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी हैराण झाला असाल तर ही बातमी तुम्हाला दिलासा देऊ शकते.
Published on

FM On Fuel Tax: सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. तुम्हीही पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी हैराण झाला असाल तर ही बातमी तुम्हाला दिलासा देऊ शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आता इंधनाच्या वाढत्या किमतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सलग 6 महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, सरकार आता दर 15 दिवसांनी कच्चे तेल, डिझेल-पेट्रोल आणि एव्हिएशन फ्युएल (एटीएफ) वर लावण्यात आलेल्या नवीन कराचा आढावा घेणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. म्हणजेच सरकारकडून आंतरराष्ट्रीय किमती लक्षात घेऊन इंधन कराचा दर पंधरा दिवसांनी म्हणजेच 15 दिवसांनी आढावा घेतला जाईल.

Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman: धरा, पकडा! 'अमली पदार्थांच्या तस्करीमधील मोठ्या माशांवर...'

अर्थमंत्र्यांनी माहिती दिली

इंधनाच्या किमतींबाबत अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, 'ही कठीण वेळ आहे, जागतिक स्तरावर तेलाच्या किमती बेलगाम झाल्या आहेत. वास्तविक, यावेळी जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मात्र, सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या आहेत.'

अर्थमंत्री पुढे म्हणाल्या की, 'आम्ही निर्यातीला परावृत्त करु इच्छित नाही, तर देशांतर्गत त्याची उपलब्धता वाढवू इच्छितो. जर तेल उपलब्ध नसेल आणि निर्यात होत राहिली, तर त्याचा काही भाग आपल्या नागरिकांसाठीही ठेवला जाईल.'

Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman: अर्थमंत्र्यांची घोषणा, मोदी सरकारच्या आठ वर्षात दोन लाख कोटींची बचत!

यापूर्वी, सरकारने पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनाच्या निर्यातीवरही कर लागू करण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत पेट्रोल आणि एटीएफच्या निर्यातीवर प्रतिलिटर 6 रुपये आणि डिझेलच्या निर्यातीवर 13 रुपये प्रतिलिटर कर लावण्यात आला आहे. दुसरीकडे, कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत असताना सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com