Aston Martin Car Dainik Gomantak
अर्थविश्व-

Aston Martin च्या 'या' नव्या कोऱ्या कारची वाऱ्याशी स्पर्धा; भारतीय बाजारपेठेत दाखल!

4 कोटी 63 लाख रूपये किंमत, टॉप स्पीड ताशी 310 किलोमीटर

गोमन्तक डिजिटल टीम

Aston Martin: ब्रिटनला लक्झरी कार ब्रँड असलेल्या अॅस्टन मार्टिन ने त्यांची नवी अद्ययावत एसयुव्ही कार भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. अॅस्टन मार्टिन DBX707 असे या कारचे नाव आहे. या कारच्या छायाचित्रांवर कारप्रेमी फिदा झाले असून ही छायाचित्रे सोशल मीडियात व्हायरल झाली आहेत.

Aston Martin Car

अॅस्टन मार्टिनने या लेटेस्ट कारसाठी सस्पेन्शन, गियरबॉक्स, स्टीयरिंग आणि ब्रेक ही फीचर्स अद्ययावत केली आहेत. भारतीय एसयुव्ही ग्राहकांसाठी या कारची एक्स शोरूम किंमत 4 कोटी 63 लाख रूपये इतकी ठेवली गेली आहे. या कारची किंमत महागडी वाटू शकते, पण ती किंमत या कारच्या विविध वैशिष्ट्यांना साजेशी आहे. अॅस्टन मार्टिन कंपनीची ही भारतातील सर्वात महागडी कार आहे. कारच्या DBX व्हर्जनच्या तुलनेत ही कार 48 लाख रुपयांनी अधिक महाग आहे.

ही कार स्पोर्टी डिझाईनमध्ये आहे. यात डबल वेन मॅश पॅटर्नसह मोठी ग्रिल, नवीन एलईडी, डीआरएल, नवीन बंपर आहे. यात रूफ स्पॉयलर आणि डकटेल स्टाईलची बूटलीड आहे. क्वाड-एग्झॉस्ट सिस्टम आणि एक मोठा रियर डिफ्यूजर आहे. तसेच 10.25 इंचाची स्क्रीन, 12.3 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि लेदर सीट आहे.

Aston Martin Car

22 इंच अलॉय व्हीलसह 23 इंच अलॉय व्हीलचा पर्यायही आहे. कंपनीने यात पॉवरसाठी मर्सिडीजचे 4.0 लीटर ट्विन टर्बो चार्ज V8 इंजिनचा वापर केला आहे. ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टिम आणि पॅडल शिफ्टरसह 9 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शनमध्ये ही कार उपलब्ध आहे. यात एयर सस्पेन्शन उत्तम असून स्टीअरिंग सिस्टिम आणि नवीन कार्बन सेरॅमिक ब्रेक डिस्कमुळे कारला डायनॅमिक लूक मिळाला आहे. परफॉरर्मन्सचा विचार केला तर केवळ सेकंदात ही कार शुन्य ते १०० किलोमीटरचे स्पीड गाठते. या कारचे टॉप स्पीड ३१० किलोमीटर प्रती तास इतके आहे.

या कार्ससोबत असेल स्पर्धा

भारतीय बाजारपेठेत अॅस्टन मार्टिन DBX707 ची स्पर्धा पोर्शे केयेन टर्बो जीटी, मसेराती लिव्हांते ट्रोफीयो, फेरारी पुरोसांग्वे, लॅम्बोर्गिनी उरुस परफॉर्मेंटे आणि बेंटले बेंताया स्पीड या अलिशान कार्ससोबत असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rakhi 2025 Lucky Colors: रक्षाबंधन विशेष, राशीनुसार कपड्यांचे आणि राखीचे कोणते रंग शुभ आहेत? जाणून घ्या

Nagpanchami 2025: संपूर्ण गोव्यात नागपंचमी उत्साहात साजरी

Free Train To Konkan: चाकरमान्यांका बाप्पा पावलो! गणेशोत्सवात दादर ते कुडाळ करता येणार 'मोफत प्रवास', एका कॉलवर करा बुकिंग

Goa Assembly Session: समुद्रकिनाऱ्यांवरून बेकायदेशीर दलाल आणि मार्गदर्शकांना हटवा

IND vs ENG: फक्त 'इतकं' करा आणि 2 विक्रम मोडा! ओव्हलमध्ये घडणार मोठा करिष्मा; भारत-इंग्लंड मिळून मोडणार 70 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT