Packaging Rules And Regulations in India: केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने खाद्य आणि पेय संबंधित पॅकेज केलेल्या उत्पादनांबाबत एक नवीन अधिसूचना जारी केली आहे. पॅकेज केलेल्या वस्तूंसाठी जारी केलेले नवीन नियम आता 1 डिसेंबर 2022 पासून लागू होतील. या नियमानुसार त्यात अनेक बदल पाहायला मिळतील.
(Packaging Rules And Regulations in India)
केंद्र सरकारने कायदेशीर मेट्रोलॉजी, पॅकेट कमोडिटी नियमांमध्ये बदल केले आहेत. त्याअंतर्गत दूध, चहा, बिस्किटे, खाद्यतेल, मैदा, बाटलीबंद पाणी आणि पेये, बेबी फूड, कडधान्ये, तृणधान्ये, सिमेंटच्या पिशव्या, ब्रेड, डिटर्जंट अशा 19 वस्तू येणार आहेत. तसेच, आता वस्तूवर उत्पादनाची तारीख लिहिणे आवश्यक असेल.
ग्राहकांना फायदा होईल
नवीन नियमानुसार पॅकेज केलेल्या वस्तूचे वजन प्रमाणापेक्षा कमी असेल तर त्याची किंमत प्रति ग्रॅम किंवा प्रति मिलीलिटर लिहिणे आवश्यक आहे. एका पाकिटात 1 किलोपेक्षा जास्त माल असेल तर त्याचा दर 1 किलो किंवा 1 लिटरनुसार लिहावा लागेल. किमती आकर्षक व्हाव्यात म्हणून अनेक कंपन्या कमी वजनाची पॅकेट बाजारात आणत असतात.
मानक पॅकिंग नियम
केंद्र सरकारने खाद्य कंपन्यांसाठी मानक पॅकिंग असावे असा नियम केला होता. आता वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांना ते बाजारात किती पॅकेज वस्तू विकतात हे ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल.
उत्पादन वर्ष सांगा
नवीन नियमानुसार, आयात केलेल्या पॅकेज आयटमवर महिना किंवा उत्पादन वर्षाची माहिती देणे आवश्यक असेल. सध्या पॅकेज वस्तूंच्या आयातीवर केवळ आयातीचा महिना किंवा तारीख द्यावी लागते. म्हणजे जर 1 किलो किंवा 1 लिटरपेक्षा कमी माल पॅकेटमध्ये पॅक केला असेल तर त्यावर प्रति ग्रॅम किंवा प्रति मिलीलीटर किंमत लिहावी लागेल. एका पाकिटात 1 किलोपेक्षा जास्त माल असेल तर त्याचा दरही 1 किलो किंवा 1 लिटरनुसार लिहावा लागेल. यासोबतच पॅकेज केलेल्या वस्तूंवर मीटर किंवा सेंटीमीटरच्या आधारे किंमतही लिहावी लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.