भारतात सणासुदीला सुरुवात झाली आहे.काही दिवसांवर दिवाळी येउन ठेपली आहे. या दिवाळीपूर्वी मोदी सरकारने लाखो रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांइतका बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे हा बोनस दसऱ्यापूर्वीच कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. रेल्वेने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, सरकारच्या या निर्णयानंतर सुमारे 11.27 लाख कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. हा बोनस दसरा ते दिवाळी (Diwali) दरम्यान कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे . हा बोनस गॅझेट नसलेल्या सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना उपलब्ध असेल.
* कर्मचाऱ्यांना बोनसमधून प्रोत्साहन मिळेल
रेल्वेने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले, हा बोनस कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन म्हणून काम करेल. त्यामुळे कर्मचारी रेल्वेच्या कामकाजात आपले सकारात्मक योगदान देऊ शकतील. बोनस मिळाल्याने कर्मचाऱ्यांची या सणासुदीत (Festival) खरेदी करण्याची क्षमता वाढेल आणि या सणासुदीच्या काळात अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.
* कोरोनाच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी बजावली महत्त्वाची भूमिका
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, 'कोरोना (Corona) काळात रेल्वेच्या योग्य संचालनात रेल्वे कर्मचाऱ्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशाची अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे.
यासोबतच रेल्वे कर्मचाऱ्यांचा बोनस मंजूर केल्याबद्दल रेल्वेमंत्र्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर (Twitter) अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचे रेल्वेच्या वतीने आभार मानले आहेत. विशेष म्हणजे, लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान, देशात अन्न, कोळसा आणि इतर आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात रेल्वेने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामुळे देशातील आर्थिक घडामोडींना गती मिळण्यास मदत झाली आहे.
रेल्वेने तिसरी वंदे भारत ट्रेन सुरू केली
30 सप्टेंबर 2022 रोजी, पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील (Gujrat) गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. देशातील ही तिसरी वंदे भारत ट्रेन आहे. ही ट्रेन महाराष्ट्रातील गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यान वेगात भरेल.
देशातील पहिली वंदे भारत ट्रेन दिल्ली ते बनारस दरम्यान तर दुसरी ट्रेन दिल्ली ते कटरा दरम्यान धावत आहे. वंदे भारत ट्रेन ही पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान आहे. ती केवळ 52 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते. ही ट्रेन आगामी काळात भारतीय रेल्वेसाठी गेम चेंजर ठरू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.