Special Trading Session Dainik Gomantak
अर्थविश्व

2 मार्चला शेअर बाजारात विशेष Trading Session का? NSE ने सांगितला संपूर्ण प्लॅन

Share Market Special Session: 24 फेब्रुवारी 2021 रोजी NSE मधील तांत्रिक बिघाडामुळे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता.

Ashutosh Masgaunde

You will be able to trade in the stock market on the coming 2nd March i.e. Saturday, NSE is holding a special live trading session:

येत्या 2 मार्च रोजी म्हणजेच शनिवारीदेखील तुम्हाला शेअर बाजारात देखील ट्रेडिंग करता येणार आहे.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) 2 मार्च रोजी विशेष थेट ट्रेडिंग सत्र आयोजित करत आहे. यामध्ये, इंट्राडे काम डिजास्टर रिकवरी साइटवर हलविले जाईल. कामकाजावर परिणाम होऊ शकेल अशा कोणत्याही अनपेक्षित घटनेला सामोरे जाण्यासाठी एक्सचेंज तयार ठेवण्यासाठी हे सत्र आयोजित केले जात आहे.

एनएससीने नुकतेच जारी केलेल्या आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, "सदस्यांना सूचित केले जाते की, एक्सचेंज शनिवार, 2 मार्च रोजी प्राथमिक साइटवरून डिजास्टर रिकवरी साइटवर इंट्राडे स्विचसह एक विशेष थेट ट्रेडिंग सत्र आयोजित करत आहे."

शनिवार, 2 मार्च रोजी असलेले हे ट्रेडिंग सेशन हे इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये असेल.

2 मार्च 2024 रोजी पहिले ट्रेडिंग सेशन सकाळी 9:15 ते 10:00 पर्यंत असेल. दुसरे ट्रेडिंग सत्र सकाळी 11:30 ते दुपारी 12:30 पर्यंत असेल.

यापूर्वी विशेष ट्रेडिंग सेशन २० जानेवारीला होणार होते, मात्र अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे २० जानेवारीला पूर्ण ट्रेडिंग सेशन झाले आणि २२ जानेवारीला सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

24 फेब्रुवारी 2021 रोजी NSE मधील तांत्रिक बिघाडामुळे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. यामुळे सकाळी 11.40 ते दुपारी 3.45 या वेळेत सर्व विभागातील व्यापार थांबवण्यात आला आणि टेलिकॉम सेवा प्रदात्यांच्या समस्यांमुळे हे घडल्याचे सांगण्यात आले.

सेबीने एक्सचेंजेसना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर एक्सचेंजेसने 72.6 कोटी रुपयांच्या पेमेंटसह बाजार नियामकासह प्रकरण निकाली काढले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Startup Policy: गोमंतकीय तरुणांसाठी मोठी बातमी! सरकारचे स्टार्टअप धोरण जाहीर; 10 हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

Kadamba Protest: EV बस 2 कोटीची, पगार मात्र 600 रुपये! कदंब चालक मागण्यांसाठी आक्रमक; संपाचा दिला इशारा

Rama Kankonkar: जेल की बेल? काणकोणकर हल्लाप्रकरणी 8 संशयित न्यायालयात होणार हजर; प्रकरणाची ठरणार दिशा

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

SCROLL FOR NEXT