Income Tax Clears LIC Refund: एलआयसीला 21,740 कोटींचा फायदा; अनेक वर्षांपासून रखडलेला रिफंड इन्कम टॅक्सने केला मंजूर!
Income Tax Clears LIC Refund: सरकारी विमा कंपनी एलआयसीला मोठा फायदा झाला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या एलआयसीचा परतावा आयकर विभागाने मंजूर केला आहे. यामुळे एलआयसीला सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा नफा झाला आहे. LIC ला आतापर्यंत 21,740.77 कोटी रुपयांचे रिफंड जारी करण्यात आले आहेत. याशिवाय, एलआयसीला आगामी काळात सुमारे 3700 कोटी रुपये अधिक मिळतील.
मागील 7 वर्षांचा परतावा मंजूर
दरम्यान, परतावा 2012-13, 2013-14, 2014-15, 2016-17, 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या मूल्यांकन वर्षांसाठी आहे. परताव्याची एकूण रक्कम 25,464.46 कोटी रुपये होती. तथापि, प्राप्तिकर विभागाने फेब्रुवारीमध्ये 21,740.77 कोटी रुपये जारी केले आहेत. दरम्यान, उर्वरित रक्कम आयकर विभागाकडून वसूल करण्यासाठी एलआयसी प्रयत्न करत आहे. सध्या, एलआयसीला आयकरातून परतावा म्हणून 3,723.69 कोटी रुपये अधिक मिळतील.
दुसरीकडे, LIC चा IPO मे 2022 मध्ये आला होता. तेव्हा IPO ची किंमत 902 ते 949 रुपये होती. मात्र, त्यादरम्यान शेअर्स सवलतीच्या दरात लिस्ट करण्यात आले. गेल्या काही महिन्यांत एलआयसीच्या शेअर्समध्ये वाढ झाली असून त्याचा फायदा गुंतवणूकदारांना झाला आहे. शुक्रवारी एलआयसीचे शेअर्स 1.53 टक्क्यांनी घसरुन 1,039.90 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका महिन्यात शेअर्स 17 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.
प्रत्यक्ष कर संकलनही वाढले
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 20.25% ने वाढले आहे आणि आता ते 15.60 लाख कोटी रुपये आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे.
एलआयसीचे मार्केट कॅप घसरले
शेअर बाजारात वाढ होऊनही, भारतातील सहा सर्वोच्च मार्केट कॅप कंपन्यांमध्ये मोठी घसरण झाली. या सहा कंपन्यांच्या संपत्तीत 71,414 कोटी रुपयांची घट झाली आहे. त्यात LIC आणि Tata Consultancy Services (TCS) देखील आहेत. 10 सर्वोच्च मार्केट कॅप कंपन्यांपैकी (LIC), TCS, ITC, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या एकूण मालमत्तेत 71,414.03 कोटी रुपयांची घसरण झाली. LIC चे मार्केट कॅप शुक्रवारी ₹26,217.12 कोटींनी घसरुन ₹6,57,420.26 कोटींवर आले कारण शेअर्स 1.5 टक्क्यांहून अधिक घसरले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

