Yes Bank
Yes Bank  Dainik Gomantak
अर्थविश्व

Yes Bank Lays Off: येस बँकेने 500 कर्मचाऱ्यांना टाकले काढून; डिजिटल बँकिंगवर लक्ष केंद्रित करण्याचा सांगितला प्लॅन

Manish Jadhav

गेल्या काही दिवसांपासून येस बँक कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. येस बँकेने 500 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे.

रीस्ट्रक्चरिंग प्रोसेसचा एक भाग म्हणून खर्चात कपात करण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत बँक आणखी कर्मचारी (Employees) कपात करु शकते, असे मानले जात आहे. मात्र, बडतर्फ कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांच्या पगाराएवढी भरपाईही देण्यात आली आहे.

मल्टीनॅशनल अॅडवाइजरचा सल्ला

ET अहवालात सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, येस बँकेने मल्टीनॅशनल अॅडवाइजरच्या सल्ल्यानुसार इंटरनल रीस्ट्रक्चरिंग प्रोसेस सुरु केली आहे. या अंतर्गत, आतापर्यंत सुमारे 500 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे आणि येत्या आठवड्यात आणखी कपात होऊ शकते. बँकेने याची पुष्टी करत पुढे सांगितले की, ते आपल्या वर्कफोर्समध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहेत.

डिजिटल बँकिंगवर भर द्या

ईटीच्या सूत्रानुसार, बँक डिजिटल बँकिंगवर (Digital Banking) लक्ष केंद्रित करु इच्छित आहे. यासोबतच मॅन्युअल काम कमी करण्याचा मानस आहे. यामुळे बँकेला खर्चात कपात करणे देखील शक्य होईल. सध्या सुरु असलेल्या रीस्ट्रक्चरिंग प्रोसेसमुळे बँकेला त्याच्या ऑपरेशनल खर्चात कपात करण्यास मदत होईल, असे एका सूत्राने सांगितले.

बँकेचा कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च

गेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या ऑपरेशनल खर्चात सुमारे 17% वाढ झाली आहे. त्याचवेळी, 2024 ते 2023 या आर्थिक वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांच्या खर्चात 12% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. बँकेने आर्थिक वर्ष 24 च्या अखेरीस कर्मचाऱ्यांवर 3774 कोटी रुपये खर्च केले होते तर आर्थिक वर्ष 23 मध्ये 3363 कोटी रुपये खर्च केले होते. FY24 च्या अखेरीस बँकेचे अंदाजे 28,000 कर्मचारी होते आणि एका वर्षाच्या कालावधीत 484 कर्मचारी जोडले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao Demolition: रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड

Colva Police: सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार

Goa Accident: अपघात नव्हे घातपात! कन्‍हैया कुमारच्या शरीरावर आढळल्या वाराचे निशाण, फोंडा पोलिस संशयाच्‍या घेऱ्यात

Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीत का गेले होते? बदलीबाबत हालचालींना वेग

कोणत्याही क्षणी येणार आदेश, Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना

SCROLL FOR NEXT