Bank Fired Staff: वेल्स फार्गो बँकेने आपल्या डझनभर कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. हे कर्मचारी कामाचे नाटक करायचे, असा बँकेचा आरोप आहे. मालमत्ता आणि गुंतवणूक व्यवस्थापन युनिटमध्ये काम करणारे हे कर्मचारी कीबोर्ड सिम्युलेशन प्रकरणात दोषी आढळले आहेत.
वेल्स फार्गो बँकेने डझनभर कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. ते काम करण्याचे नाटक करत असल्याचा दावा बँकेने तपासात केला आहे. गेल्या महिन्यात बँकेने मालमत्ता आणि गुंतवणूक व्यवस्थापन युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. हे कर्मचारी 'फेक कीबोर्ड ॲक्टिव्हिटी'मध्ये कथितपणे गुंतलेले तपासात उघड झाले.
जेव्हा हे प्रकरण फायन्शियल इंडस्ट्री रेग्युलेटरी अथॉरिटीसमोर पोहोचले तेव्हा कीबोर्ड इम्युलेशन प्रकरणांमध्ये कर्मचारी दोषी आढळले. वेल्स फार्गो बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हाय जॉब स्टॅंडर्ड सेट केले आहेत. कंपनी कोणत्याही प्रकारचे अनैतिक वर्तन सहन करत नाही. तथापि, अहवालात असे नमूद केलेले नाही की, कर्मचारी कथितपणे घरुन काम करण्याचे नाटक करत होते.
Goldman Sachs Group Inc. आणि JPMorgan Chase & Co. हे आज वेल्स फार्गो बँकेचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी आहेत. या कंपन्यांमध्ये सतत स्पर्धा असते. यावेळी, वेल्स फार्गोच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत कार्यालयात काम करताना समान गती दाखवली नाही, ज्यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.