Yes Bank: खाजगी क्षेत्रात मोठे प्रस्थ असेल्या येस बँकेने सप्टेंबर तिमाहीची माहिती प्रसिद्ध केली आहे. तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 32 टक्क्यांनी घसरून 152.82 कोटी रुपयांवर आला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत बँकेला 225.50 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तर, जून 2022 च्या तिमाहीत बँकेला 310.63 कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता.
जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये बँकेचे एकूण उत्पन्न 6,394.11 कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न 5,430.30 कोटी रुपये होते. मालमत्ता गुणवत्तेच्या बाबतीतही बँकेच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. बँकेचे NPA किंवा बुडीत कर्जे 2021 च्या सप्टेंबर तिमाहीत 14.97 टक्क्यांवरून 12.89 टक्क्यांवर घसरले आहे.
बुडीत कर्जे आणि इतर आपत्कालीन परिस्थितीसाठी करण्यात आलेली तरतूद वाढवण्यात आली आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत 377.37 कोटी रुपयांवरून 582.81 कोटी रुपये झाली आहे. तरतुदीत वाढ झाल्यामुळे बँकेचा नफा कमी झाला आहे.
दरम्यान, शुक्रवारी येस बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. एक दिवस अगोदरच्या तुलनेत स्टॉकमध्ये 1.50 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. बँकेचे बाजार भांडवल 40,600 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. बँकेने 9 सप्टेंबर 2022 रोजी 18.20 रुपयांपर्यंत पोहचला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.