India Vs Pakistan | World Cup Fever Dainik Gomantak
अर्थविश्व

World Cup 2023 Fever: भारत-पाकिस्तान सामन्यामुळे विमान भाडे गगनाला; गोवा-अहमदाबादसाठी मोजावे लागणार दहापट पैसे

India Vs Pakistan: सुरुवातीच्या आणि अंतिम सामन्यासाठी प्रेक्षकांमध्ये आकर्षण निर्माण झाले नसले तरी, भारत-पाकिस्तान सामन्याभोवती प्रचंड उत्साह आहे.

Ashutosh Masgaunde

Goa to Ahmedabad flight ticket price hike: अहमदाबादला जाणार्‍या विमानांच्या तिकिटांमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. देशातील प्रमुख शहरांमधून अहमदाबादला जाण्यासाठी आता 350 टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.

15 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान यांच्यात विश्वचषक क्रिकेट सामना होणार आहे. त्यामुळे विमान प्रवासाला मोठी मागणी निर्माण झाली आहे.

क्रिकेट चाहते, व्हीआयपी लोक आणि प्रायोजकांनी हॉटेल आणि फ्लाइटचे बुकिंग आधीच करुन ठेवल्यामुळे, विमान प्रवास आणि हॉटेल भाड्याच्या किमती नवीन उच्चांकावर गेल्या आहेत.

गोवा-अहमदाबाद भाडे दहा पटींना वाढले

सध्या गोव्यातून अहमदाबादला जाण्यासाठी 3 ते 7 हजार भाडे आकारले जाते. मात्र, विश्वचषकादरम्यान भारत-पाकिस्तान सामन्याच्या दोन दिवस आधी आणि नंतर गोवा-अहमदाबाद विमान भाडे 6 हजार ते 31 हजार इतके आहे.

चेन्नई ते अहमदाबाद या रिटर्न ट्रिपमध्ये आता नॉन-स्टॉप फ्लाइटसाठी प्रति व्यक्ती 45,425 रुपये मोजावे लागतील.

१५ जुलैला म्हणजेच तीन महिने अगोदर तिकीट आरक्षित केले तरीही वाढीव भाडेच आकारले जात आहे. सामान्य परिस्थितीत या प्रवासासाठी सुमारे १०,००० रुपये खर्च येतो, असे प्रवासी उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले.

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतात खेळवला जाईल. उद्घाटन सामना, अंतिम सामना आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

मोठी मागणी पाहता, 14-16 ऑक्टोबरसाठी प्रमुख भारतीय शहरांमधून अहमदाबादला जाणाऱ्या फ्लाइटच्या भाड्यात अनेक पटींनी वाढ झाली आहे.

दिल्ली आणि मुंबई ते अहमदाबादच्या फ्लाइटच्या भाड्यात अनुक्रमे २०३ टक्के आणि ३३९ टक्के वाढ झाली आहे.

फ्लाइट तिकिटांच्या किमती वाढल्याबद्दल बोलताना ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाचे (टीएएआय) अध्यक्ष वीरेंद्र शाह म्हणाले की, सामन्याच्या दिवसांत विमान प्रवासाला जास्त मागणी असल्याने ही वाढ करण्यात आली आहे.

"सुरुवातीच्या आणि अंतिम सामन्याच्या दिवसांमध्ये लक्षणीय आकर्षण निर्माण झाले नसले तरी, भारत-पाकिस्तान सामन्याभोवती प्रचंड उत्साह आहे."

सामन्याच्या दिवशी प्रेक्षकांची होणारी गर्दी लक्षाक घेता, अहमदाबादमधील हॉटेल्सनी त्यांच्या भाड्यात आधीच आश्चर्यकारक वाढ केली आहे.

मोठ्या पंचतारांकित हॉटेल्सनी सामन्याच्या दिवसांसाठी आधीच त्यांच्या 60 टक्के खोल्या आणि सुट आरक्षित केल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे, हे सामने आतापासून जवळपास तीन महिन्यांनंतर ऑक्टोबरमध्ये होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT