Hero Electric Splendor News, Hero Electric Bike News  Dainik Gomantak
अर्थविश्व

हिरोची स्प्लेंडर आता होणार इलेक्ट्रिक स्वरूपात?

पेट्रोल हिरो स्प्लेंडरला इलेक्ट्रिक बाइकमध्ये देखील बदलू शकतात.

दैनिक गोमन्तक

Hero Electric Splendor : देशातील सर्वात लोकप्रिय बाईक Hero Splendor देखील इलेक्ट्रिक होण्याची चर्चा सध्या देशभर गाजत आहे. हिरो स्प्लेंडरला इलेक्ट्रिक बाईक बनवण्याच्या चर्चा अनेक स्तरांवर सुरू आहेत. या बाईकचे मायलेज चांगले असून एका चार्जमध्ये दिल्ली ते आग्रा अगदी आरामात जाऊ शकणार आहे. त्याचवेळी, या बाईकला इलेक्ट्रिक किटचे रेट्रोफिटिंग करून इलेक्ट्रिक मोटरसायकल (इलेक्ट्रिक हिरो स्प्लेंडर) मध्ये रूपांतरित केले जाऊ शकते. (Will Hero's Splendor be in electric form now)

अशा परिस्थितीत, आता देशातील सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल (इंडियाज बेस्ट सेलिंग मोटरसायकल) हीरो स्प्लेंडरचे इलेक्ट्रिक मॉडेल येणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत कंपनीकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. 240 KM सिंगल चार्जमध्ये जाईल, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. (Latest Hero Electric Bike News updates)

Hero Splendor इलेक्ट्रिक बाईक

एका ऑटो पोर्टलने असा अंदाज लावला आहे की यात 4kWh चा बॅटरी पॅक असू शकतो. त्याच वेळी, यात 2kWh ची अतिरिक्त बॅटरी देखील दिली जाऊ शकते. यासह, एका चार्जमध्ये बाईकला 240 किमीपर्यंतची रेंज मिळेल. बाईक्सच्या अशा रेंजमुळे दिल्ली ते आग्रा असा प्रवास एका चार्जमध्ये करता येतो.

अलीकडे, ओबेन, टॉर्क आणि रिव्हॉल्ट सारख्या ईव्ही स्टार्ट-अप कंपन्यांनी 200KM पर्यंतच्या इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच केल्या आहेत. पेट्रोल स्प्लेंडर इलेक्ट्रिक होऊ शकते, सध्या, तुम्ही तुमच्या पेट्रोल आधारित हिरो स्प्लेंडरमध्ये इलेक्ट्रिक (Electric Bike) किट रिट्रोफिट करू शकता. त्यामुळे तुमचा पेट्रोलवरील मासिक खर्च जवळपास निम्मा होईल. ठाण्यातील एका स्टार्टअप कंपनी GoGoA1 ने Hero Splendor साठी खास इलेक्ट्रिक किट तयार केले आहे. हे आरटीओ मान्यताप्राप्त इलेक्ट्रिक किट फक्त 35,000 रुपयांमध्ये बसवता येते. ते तुमची स्प्लेंडर बाईक (Hero Bike) इलेक्ट्रिकमध्ये बदलू शकते. मात्र, यामध्ये बॅटरीची किंमत आणि जीएसटी वेगळा भरावा लागणार आहे. पण कंपनीचा दावा आहे की, त्याचे किट एका चार्जमध्ये 151 किमी पर्यंत धावू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT