Mukesh Ambani And Manoj Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

Mukesh Ambani यांचा राईट हॅन्ड कोणाला म्हणतात? कोणाला मिळाली 1500 कोटींच्या घराची भेट?

मनोज मोदी रिलायन्सच्या अशा लोकांपैकी एक आहेत जे शांतपणे काम करतात, जे कंपनीला पुढे नेण्यात मोठी भूमिका बजावत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Mukesh Ambani And Manoj Modi: रिलायन्स इंडस्ट्रीबाहेरील फार कमी लोकांना मनोज मोदी यांच्याबद्दल माहिती असेल. मुकेश अंबानी यांनी नुकतेच मनोज मोदी यांना पंधराशे कोटींचे घर भेट दिले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​प्रमुख मुकेश अंबानी यांनी मनोज मोदींवर खूप विश्वास आहे. मनोज मोदी रिलायन्सच्या अशा लोकांपैकी एक आहेत जे शांतपणे काम करतात, जे कंपनीला पुढे नेण्यात मोठी भूमिका बजावत आहेत.

मनोज मोदी रिलायन्स इंडस्ट्रीच्या मागे असलेल्या सर्वात शक्तिशाली लोकांपैकी एक मानले जातात. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मुकेश अंबानी यांना ओळखणारे लोक मनोज मोदींना चांगले ओळखतात. मनोज मोदी मुकेश अंबानींचा राईट हॅन्ड म्हणून ओळखले जातात. जर आपण पदनामानुसार बोललो तर मनोज मोदी रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओचे संचालक आहेत.

मनोज मोदी दीर्घकाळापासून रिलायन्समध्ये कोणत्याही पदाशिवाय काम करत आहेत. मनोज मोदी 1980 पासून रिलायन्सशी जोडले गेले आहेत. मनोज मोदी यांनी धीरूभाई अंबानी यांच्यासोबतही काम केले आहे. धीरूभाई अंबानी यांनी तेल आणि पेट्रोकेमचा व्यवसाय सुरू केल्यापासून मनोज मोदी यांच्यासोबत आहेत.

मुकेश अंबानी आणि मनोज मोदी या दोघांनी मुंबईत एकत्र रासायनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास केला आहे. मनोज मोदी हे मुकेश अंबानी यांचे त्यांच्या कॉलेजच्या दिवसांपासून चांगले मित्र आहेत. जेव्हा मुकेश अंबानींनी त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे लक्ष पेट्रोकेमिकल्सवरून इंटरनेट तंत्रज्ञानाकडे वळवले तेव्हा मनोज मोदी एक प्रभावी व्यक्ती म्हणून उदयास आले.

जिओ प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुकच्या 5.7 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीत मनोज मोदींची मोठी भूमिका असल्याचे मानले जाते. फेसबुकच्या गुंतवणुकीनंतर, सिलिकॉन व्हॅलीतील अनेक गुंतवणूकदारांनी जिओमध्ये गुंतवणूक केली आहे आणि त्याला जागतिक रडारवर आणण्यास मदत केली आहे.

मनोज मोदींनी रिलायन्स जिओला अवघ्या 6 आठवड्यात एक लाख कोटी रुपये मिळवून दिले.

गेल्या काही वर्षांत मनोज मोदींची रिलायन्समधील भूमिका वाढली असून आता त्यांनी मोठ्या प्रकल्पांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. मनोज मोदी बार्गेनिंग पॉवर दाखवू लागले आहेत. वर्ष 2016 मध्ये, जेव्हा Jio ने आपली वायरलेस सेवा सुरू केली आणि फायबर ऑप्टिक केबल नेटवर्क सुरू केले, तेव्हा मनोज मोदींच्या कार्य क्षमतेचे अचूक मूल्यांकन केले गेले. स्टार्टअपशी व्यवहार करताना, मनोज मोदी पडद्याआडून वाटाघाटींवर नियंत्रण ठेवतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

SCROLL FOR NEXT