Ashwini Vaishnav Dainik Gomantak
अर्थविश्व

Hydrogen Train: देशाला कधी मिळणार पहिली हायड्रोजन ट्रेन? अश्विनी वैष्णव यांनी केली 'ही' मोठी घोषणा

Ashwini Vaishnav: आत्तापर्यंत हायड्रोजन ट्रेनची रचना फक्त तीन देशांमध्ये केली जात होती पण आता भारत देखील या यादीत सामील होणार आहे.

Manish Jadhav

Hydrogen Train in India: देशाला लवकरच हायड्रोजनवर चालणारी ट्रेन मिळणार आहे. आत्तापर्यंत हायड्रोजन ट्रेनची रचना फक्त तीन देशांमध्ये केली जात होती, पण आता भारत देखील या यादीत सामील होणार आहे. ही हायड्रोजन ट्रेन भारतातच बनवली जाईल.

दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी अर्थसंकल्पाच्या घोषणेसोबतच याची घोषणा केली. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन डिसेंबर 2023 पर्यंत धावणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. कालका-शिमला ऐतिहासिक सर्किटवर ही ट्रेन चालवली जाईल.

हायड्रोजन ट्रेन कोणत्या मार्गावर धावेल?

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, आगामी हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्यांचे नाव 'वंदे मेट्रो' असेल. या गाड्या दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे, माथेरान हिल रेल्वे (Railway), कांगडा व्हॅली, बिलमोरा वाघाई आणि मारवाड-देवगड माद्रिया मार्ग यांसारख्या ऐतिहासिक नॅरो-गेज मार्गांवर चालवण्याची योजना आहे.

हायड्रोजनची साठवणूक करणे आव्हान

तथापि, हायड्रोजन इंधन सेलची ऑपरेटिंग किंमत डिझेल इंजिनच्या तुलनेत 27% जास्त असल्याचे म्हटले जाते. हायड्रोजनची साठवणूक करणे हे त्याच्या अत्यंत ज्वलनशील स्वरुपामुळे एक आव्हान आहे.

प्रदूषणाला ब्रेक लागेल

हायड्रोजन गाड्या कार्बन डाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड किंवा पार्टिक्युलेट मॅटर यांसारखे हानिकारक प्रदूषक उत्सर्जित करत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa 2024: चित्रपट महोत्सवाला तुडुंब गर्दी; मात्र फोंड्याच्या ‘मूव्ही मॅजिकला’ अजूनही प्रेक्षक मिळेना

Saint Francis Xavier School: संत फ्रान्सिस झेवियर विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस, धबधब्यावर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याचा ठपका

Goa Live News Today: माजी सरपंच प्रशांत नाईकांकडून प्राथमिक शाळेला लाकडी बाक प्रदान

Miraai Project Goa: पडून असणाऱ्या स्क्रॅप वाहनांची समस्या संपणार! ‘मिराई’ प्रकल्पाचे मडकईत उद्‍घाटन; आमदार कामत यांची उपस्थिती

UCC and One Nation One Election : UCC, एक देश एक निवडणुकीची देशाला गरज; मुख्यमंत्री सावंत यांचे संविधान दिनी पुन्हा भाष्य

SCROLL FOR NEXT